भाजयुमोचे सुदर्शन पाटसकर यांनी केली औषध फवारणी


भाजयुमोचे सुदर्शन पाटसकर यांनी केली औषध फवारणी


कराड - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजयुमो प्रदेशचे सचिव सुदर्शन पाटसकर यांच्यावतीने लॉकडाऊन काळात कराड शहरांमध्ये गुरुवार पेठ,भाजी मंडई, कमानी मारुती मंदिर चौक परिसरात इमारतींमध्ये जंतुनाशक फवारणी करणेल आली आहे.


कोरोना या वैश्विक महामारीमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी नागरिकांना या विषाणूचा सामना करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडॉउन करून  नागरिकांना कोरोना विषाणूचा साखळी तोडण्याचे आवाहन केले आहे. या विषाणूचा महाराष्ट्रमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढतच आहे. यावेळी जनतेला धीर देणे हे आपले कर्तव्य समजून भाजयुमो प्रदेशचे सचिव सुदर्शन पाटसकर यांच्यावतीने लॉकडाऊन  काळात पुढील उपक्रम करण्याचे निश्चित करण्यात आला आहे,


कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी मशीन्स घेऊन युवा मोर्चा तर्फे कराड शहरांमध्ये गुरुवार पेठ,भाजी मंडई, कमानी मारुती मंदिर चौक परिसरात व शक्य त्या भागात व इमारतींमध्ये जंतुनाशक फवारणी केली, ही जंतुनाशक फवारणी म्हणजे कोरोनावर प्रतिबंध म्हणून करत आहे. परंतु आपण लॉकडॉउनचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन सुदर्शन पाटसकर यांनी केले आहे.