२० एप्रिलपासून राज्यात कापूस खरेदी सुरू होणार सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

 २० एप्रिलपासून राज्यात कापूस खरेदी सुरू होणार
सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती


कराड - विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्रांमध्ये कापूस खरेदी 20 एप्रिलपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे.शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस सध्या त्यांच्या घरांमध्ये आहे. तो खरेदी करणे आवश्यक असल्याने राज्य सरकारने आज निर्णय घेतला असून विदर्भ, मराठवाडयासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी तालुक्यात कापूस पिकवला जातो. तो खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार आहेत. असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.


शेतकऱ्यांचे अर्थकारण या कापूस उद्योगावर अवलंबून आहे. कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारचे झालेले आहे. शेती पूरक उद्योगांना मुभा देण्याची केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या विभागातील जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून कोरोना व लॉकडाऊन काळातील सूचनांचे पालन करून कापूस खरेदी करण्यात यावी. चांगल्या प्रतीचा कापूस उत्पादन झाला आहे. तो शेतकऱ्यांनी केंद्रावर आणावा. कापूस खरेदी केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तिक नियोजन करावे. जे शेतकरी ऑनलाईन व फोनद्वारे बुकिंग करतात त्या शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणावा हे त्यांना कळवले जाईल. कापसाची प्रत तपासून त्याचे वजन करून कापूस खरेदी केली जाईल.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूसही तो आता खरेदी केला पाहिजे अशी शासनाची भूमिका असल्यामुळे सदरचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला असल्याची माहितीही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image