महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण साधेपणाने ; फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात होणार कार्यक्रम
सातारा दि: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय येथेच सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली आहे.
या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. इतर मान्यवरांना या कार्यक्रमास आमंत्रित करण्यात येणार नाही तसेच कवायतीचे आयोजन करण्यात येणार नाही, अशीही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली.