कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध पाळा....सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ओगलेवाडीतील उपाययोजनांची केली पहाणी





कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध पाळा....सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ओगलेवाडीतील उपाययोजनांची केली पहाणी

 

 कराड - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबुन निर्बंधांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. 

 

   कराड रेल्वे स्टेशन ओगलेवाडी (ता.कराड) येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाने आगलेवाडीच्या ३ किमी परिसरातील सर्व सीमा सील केल्या आहेत. सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ओगलेवाडी यथे भेट देऊन प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. तर मुख्य बाजारपेठ ते पोलिसदुरक्षेत्रापर्यंत चालत जाऊन बंद केलेल्या रस्त्यांची पहाणी केली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, बी. एस. कांबळे, अॅड. चंद्रकांत कदम, विश्वासराव पाटील, प्रशांत यादव, विरवडेचे उपसरपंच अधिक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पानवळ, दिगंबर डांगे आदींची उपस्थिती होती. 

 

      कोरोना सारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्क रहाणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी लोकांनी बाहेर पडणे टाळवे. औषध विक्रेत्यांनी गरजू रुग्णांना घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करावी,  जी औषधे गाव पातळीवर मिळत नाहीत अशा औषधांसाठी लोकांना शहरात जावे लागू नये यासाठी गावांतील औषध विक्रेत्यांनी रुग्णांच्या आवश्यकतेनुसार शहरातून औषधे उपलब्ध करून रुग्णांना देवुन सहकार्य करावे. असे आवाहन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. 

 

    ओगलेवाडी यथे एक रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य यंत्रणा संपूर्ण गावाचा होम टू होम सर्व्हे करीत आहे. प्रशासन सतर्क आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.