अन्नधान्य वस्तूंच्या स्वरूपात मदत डिस्टन्सींग पाळून घरपोच करावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह


अन्नधान्य वस्तूंच्या स्वरूपात मदत डिस्टन्सींग पाळून घरपोच करावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह


 कराड : कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय, स्थालंतरीत व गरजू नागरिकांना काही अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न-धान्य, वस्तुंच्या स्वरुपात मदतीचे वाटप केले जात आहे, परंतु मतद वाटप करताना सोशल डिस्टन्सींग पाळले जात नसल्याचे निदर्शनास आहे. गरजु व्यक्ती, कुटुंबाला मदतीचे वाटप करावयाचे असल्यास कार्यक्रमाद्वारे न वाटप करता शक्यतो घरपोच मदतीचे वाटप करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


शहरी भागामधील गरजुंना मदतीचे वाटप करावयाचे झाल्यास अशासकीय संस्था, स्वयंसेवकांनी नागरिकांना वैयक्तिकपणे मदतीचे वाटप न करता त्यांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सोशल डिस्टन्सींग पाळून वाटप करावे. तसेच ग्रामीण भागात मदतीचे वाटप करताना वैयक्तिक न करता संबंधित तालुक्याचे तहसीलदार, सहायक पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार सोशल डिस्टन्सींग पाळून वाटप करावे. मदतीचे वाटप करताना कोणत्याही प्रकारचे छायाचित्र काढण्यास सक्त मनाई आहे. मदतीचे वाटप करताना मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.