लोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम


लोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम


कराड - महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांची एकाचवेळी रेखाटन, ठिपके, शब्द, स्क्रीबलिंग, पेपर कटींग आर्ट अशा चित्रकलेच्या विविध माध्यमातून 5 वेगवेगळी चित्रे रेखाटत अनोखी आदरांजली डाॅ.संदीप डाकवे यांनी वाहिली आहे. दि.23 एप्रिल रोजी बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी आहे, या पाश्र्वभूमीवर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ही चित्रे साकारली आहेत. 


लाॅकडाऊन मुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत, अशावेळी घरी उपलब्ध असलेल्या चित्रकलेल्या साहित्यातून डाॅ.संदीप डाकवे यांनी ही चित्रे तयार केली आहेत. कोरोना च्या पाश्र्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब देसाई यांची चित्रे रेखाटून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.
मरळी (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे वैशिष्टयपूर्ण स्मारक पाहून सदर चित्रे रेखाटण्याची कल्पना डाॅ.संदीप डाकवे यांच्या मनामध्ये आली आणि ती प्रत्यक्षात उतरवली आहे. लाॅकडाऊनच्या काळातील वेळेचा संदीप डाकवे यांनी असा सदुपयोग केला आहे.


लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे साहित्य व कलाप्रेमी आहेत. चित्रप्रदर्शन, वर्तमानपत्र कात्रण प्रदर्शन, हस्तलिखित प्रकाशन, रांगोळी प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन अशा विविध प्रसंगी ना.शंभूराज देसाई यांनी आवर्जून उपस्थित राहून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे, कलात्मक दृष्टीकोनाचे, सामाजिक बांधिलकी जपणाÚया कलाविषयक गोष्टींचे नेहमीच भरभरुन कौतुक केले आहे.
अखिल भारतीय विश्वविक्रमांची नोंद घेणाÚया ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात दोनदा नाव नोंदवलेले डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत. 


या उपक्रमातूतन केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/-, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज व माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना प्रत्येकी रु.5,000/-, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रु.3,000/-, भारत के वीर या खात्यात रु.1,000/- अशी रोख मदत केली आहे. संदीपच्या या वैविध्यपूर्ण उपक्रमांची दखल प्रिंट मिडीयासह टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, ए एम न्यूज तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांनी घेतली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या साकारलेल्या विविध चित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेले वैविध्यपूर्ण कलात्मक उपक्रम:


शब्दातून चित्रे, व्यंगचित्रे, खडूतन अष्टविनायक, मोरपीस व जाळीदार पिंपळाच्या पानावर कलाकृती, पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे, कॅलीग्राफीतून जवानांना सलाम, वारीचे पोस्टर रेखाटून शुभेच्छा, एक दिवा जवानांसाठी, अक्षरातून विठ्ठल कलाकृती, भिंतीवर वारीचे चित्र, पेपर कटींग आर्ट, रांगोळी रेखाटन, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश, पोस्टर रेखाटन, 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा इ.