कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 


कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 


कराड - सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या लढाईत अग्रभागी असणारे कराड येथील कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची सोशल मिडीयातून जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयातून अफवा पसरविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


व्हाट्सअप संदेश पाठवुन हॉस्पीटलची तसेच अतुल भोसले, सुरेश भोसले यांची जाणीवपुर्वक बदनामी केली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीसोबत आक्षेपार्ह मेसेजचा स्क्रीनशॉट जोडला आहे. सदरचा संदेश दिनांक 23/04/2020 रोजी दुपारी 2.39 वाजता मा. अतुलबाबा यांचे मोबाईलवर आलेला असुन तो त्यांनी पाहिलेला आहे.आज केवळ कराड तालुक्यातच नव्हे संपुर्ण सातारा जिल्हयात सर्वोकृष्ट आरोग्य सेवा देण्यात कृष्णा हॉस्पीटल अग्रेसर आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईत आज
कृष्णा हॉस्पीटल महत्वपुर्ण भूमिका बजावत आहे. कृष्णा हॉस्पीटलचे अनेक कर्मचारी जीवाची बाजी लावून या संकटाचा सामना करत आहेत.


अंशावेळी या हॉस्पीटलवर आणि या हॉस्पीटलचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले (बाबा), डॉ.अतुल भोसले (बाबा) यांच्यावर सोशल मिडीयातुन जाणीवपुर्वक गंभीर स्वरुपाची चिखलफेक केली जात आहे. तसेच कोरोना प्रसाराच्या अनुषंगाने आक्षेपार्ह आणि तथ्यहीन विधाने या मर्सेजमधुन करण्यात आली आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये नाहक भिती परसण्याची शक्यता आहे. तरी, कोरोनाच्या अनुषंगाने सोशल मिडीयातुन
अशाप्रकारच्या अफवा पसरविणा-या या संबधित बलराज पाटील नावे इसमावर आणि ज्या सोशल मिडीया ग्रुपवरुन हे मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्या ग्रुप अॅडमिनवर नाहक गंभीर स्वरूपाच्या बदनामीच्या भा.द.वि.सं कलम 399,500 नुसार, अफवा पसरविण्यासाठी 505(2) अन्वये, व्हॉटसअपच्या माध्यमातुन अफवा परसविण्यासाठी भा.द.वि. 505 अन्वये, चुकीची अफवा पसरविण्सासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कलम 52 आणि भिती निर्माण होईल अशी अफवा पसरविल्याबद्दल कलम 54 अंतर्गत संबधीत व्यक्तींचे विरुध्द तक्रार कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.


भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 


"त्रस्त कराडकर" असे बोगस नाम धारण करून हेतूपुरस्सर बदनामी करण्याचा हा उद्योग अनेक वर्ष सुरू आहे. वास्तविक पाहता या मेसेजमध्ये पत्रकारांचीही उणीदुणी काढण्यात आली आहेत. "चाटू बातमीदार" असा उल्लेख करून पत्रकारांचा अवमान व अपमान केला आहे.कराड शहर व तालुक्यातील पत्रकार याबाबत पुढाकार घेऊन संबंधितावर कठोरात कठोर कारवाई करावी, यासाठी आग्रही मागणी करणार आहेत. "त्रस्त कराडकर" असा उल्लेख करून या भामट्याचा पोलिसांनी पर्दापाश करून त्याचे नाव, गाव, पत्ता उघड करावा अशी मागणी पत्रकारांच्यावतीने करण्यात आली आहे.