पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटपपुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटपपुणे: संचारबंदीमुळे आपल्या मूळ गावी परतू न शकलेल्या भोर तालुक्यातील मजुरांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य यांचे वाटप करण्यात आले. 'एशियन पेंट्सव 'वनराईसंस्था यांनी सामाजिक बांधिलकीतून ही मदत केली. भोरचे नायब तहसीलदार मा. बबनराव तडवी व स्थानिक पत्रकार मंडळी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. किमान महिनाभर पुरेल इतका शिधा येथील प्रत्येक गरजू कुटुंबाला देण्यात आला. तसेच ज्यांच्यापर्यंत कोणत्याही माध्यमाद्वारे कोरोना विषाणू संदर्भात माहिती पोहचत नाही अशा लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती या संस्थांमार्फत करण्यात आली. सध्याच्या संचारबंदीच्या काळात अडचणीत सापडलेल्या गोरगरीबांचे आयुष्य सुसह्य होण्यास या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.