राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप३ एप्रिलपासून मोफत तांदूळ टप्प्याटप्प्याने उपलब्ध - छगन भुजबळ


राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप३ एप्रिलपासून मोफत तांदूळ टप्प्याटप्प्याने उपलब्ध - छगन भुजबळ


मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ५ एप्रिल २०२० या पाच दिवसात  राज्यातील ६५लाख ५९ हजार ९५६ शिधापत्रिका धारकांना तब्बल १६ लाख ३७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.