कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास अलर्ट....दिवसातून दोनदा मंत्री,राज्यमंत्री,आमदार यांचेशी साधतायत संवाद


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास अलर्ट....दिवसातून दोनदा मंत्री,राज्यमंत्री,आमदार यांचेशी साधतायत संवाद


कराड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे हे पुर्ण क्षमतेने कोरोनाच्या संकटाचा सामना करताना दिसत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे.त्याहीपेक्षा त्यांचेकडे येणाऱ्या प्रत्येक छोटया-मोठया सुचनांची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांचेकडून करण्यात येत आहे.कोरोनाचा सामना करण्याकरीता ते २४ तास अलर्ट असून या पार्श्वभूमिवर ते प्रतिरोज राज्यातील मंत्री,राज्यमंत्री व आमदार यांचेशी दिवसातून दोनवेळा दुरध्वनीवरुन संपर्क साधून संवाद साधत आहेत.कोरोना संकटाचा सामाना करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे तुम्ही तुमची,तुमच्या मतदारसंघातील जनतेची खबरदारी घ्या असे वारंवार ते दुरध्वनी वरुन आम्हा लोकप्रतिनिधींना सांगत असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.


कोरोना विषाणूचे देशात आणि राज्यात पाय पसरायला सुरवात झाल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी वेळीच सावधगिरी बाळगून या महामारीचा सामना करण्याकरीता व या विषाणूचा नायनाट करण्याकरीता योग्य त्या उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.कोरोना या माहामारीच्या रोगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी राज्यामध्ये संचारबंदी,जमावबंदी,राज्यबंदी,जिल्हाबंदी,करण्याच्या घोषणा वेळीच करुन राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना तसेच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम करण्याच्या सुचना केल्या आहेत. राज्यामध्ये दिवसेंदिवस या कोरोना महामारीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी, जनतेशी संवाद साधणे,त्यांना या आजाराचे गांभीर्य पटवून देत काळजी घेण्याची विनंती करणे. डॉक्टरांच्या संपर्कात राहणे या बाबींना त्यांनी प्राधान्य देत नागरिकांनी घाबरु नका,सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असे आवाहनही सातत्याने ते राज्यातील जनतेला करीत आहेत.कोरोनाचा सामना करण्याकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पुर्तता करण्याकरीता त्यांनी कंबर कसली असून राज्यातील रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य तपासण्या करण्याकरीता लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा देणेसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.कोरोनाच्या संदर्भात त्यांचेकडे राज्यभरातून येणाऱ्या वारंवार सुचना, त्यावर करावयाच्या कार्यवाही अशा सर्व बाबी मुख्यमंत्री वेळोवेळी चोखंदळपणे करीत असल्याचे यातून निदर्शनास येते आहे.


या सर्व घाईगडबडीतून न चुकता गत १५ दिवसापासून ते दिवसभरात राज्यातील मंत्री,राज्यमंत्री व आमदार यांना स्वत: मातोश्रीमधून,मुख्यमंत्री कार्यालयातून दुरध्वनी करीत आहेत व तुमच्या मतदारसंघात, तुमच्या जिल्हयात कोरोनाची काय परिस्थिती आहे,कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती घेत आहेत.कोरोना संकटावर उपाययोजना करताना निधी कसा उपलब्ध करुन देता येईल याचीही माहिती ते राज्यातील मंत्री,राज्यमंत्री व आमदारांना देत आहेत. त्यांच्या बोलण्याची सुरुवात होते ती प्रथमत: कुठे आहात,काळजी घेताय ना? स्वत:ची,परिवाराची,मतदारसंघातील जनतेची काळजी घ्या,जास्त फिरत नाही ना? फिरु नका,वर्क फॉर्म होम करा घरात बसूनच मतदारसंघातील समस्यांची माहिती घ्या,जिथे गरज आहे तिथेच जा आणि याच सुचना मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला दया असे ते वारंवार सांगत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ज्या काही आवश्यक घोषणा करायच्या आहेत त्या मी वेळोवेळी करीत आहेच. संचारबंदीचा त्रास जनतेला होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. असे ते सांगत आहेत.


राज्यातील जनतेला संकटात काळजी घेणारे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या रुपाने लाभले असून कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाची त्यांची रोजची धडपड महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे 'कोरोना' व्हायरसच्या संकटाच्या काळात चांगले काम करीत आहेत. आम्ही त्यांचे जाहीर आभार मानतो,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेवर महाराष्ट्रातील जनता स्तुतीसुमनं उधळत आहे हे पाहून अत्यानंद होत आहे.कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याकरीता कार्यरत असणाऱ्या राज्यातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक केले जात असून सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,असा दिलासाही मुख्यमंत्र्याकडून दिला जात असून मुख्यमंत्र्यांच्या या संवादामुळे आपल्या कामाची दखल घेतली जात आहे,कोणीतरी आपलीही काळजी घेत आहे याचे समाधान कर्मचाऱ्यांना व जनतेला त्यांच्या संवादातून मिळत आहे.पक्षाचे प्रमुख या नात्याने पक्षाची भूमिका बजावणारे मा.उध्दवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भूमिका बजाविताना अत्यंत नम्रपणे व प्रामाणिकपणे राज्याच्या हिताचे निर्णय घेत एक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून बजावित असलेली भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या कायम स्मरणात राहणारी असल्याचेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.