राज्यपालांच्या ईस्टरनिमित्त शुभेच्छा


राज्यपालांच्या ईस्टरनिमित्त शुभेच्छा


मुंबई, : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईस्टर निमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर रविवार प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. येशू ख्रिस्ताचे विशुद्ध आणि दयापूर्ण जीवन सर्वांना गरीब व गरजू मानवबंधूंच्या सेवेसाठी कार्य करण्यास प्रेरित करो. ईस्टर रविवार निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.