वाहन चालक पदासाठी माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी
सातारा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याकरिता कोरानाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश्य परिस्थिती निर्माण झालेस ती हाताळण्यासाठी वाहन चालक इच्छुक माजी सैनिकांची आवश्यकता भासू शकते. तरी सातारा जिल्ह्यातील सैन्य सेवेतून चालक पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी त्यांच्या नावांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या zswo_satara@maharashtra.gov.in या ई-मेलवर कळविण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.