डॉ. अतुल भोसले दररोज साधताहेत कराडकरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद...समाजातील विविध घटकांना दिलासा देण्याचे महत्वपूर्ण कार्य; आस्थेने विचारपूस


डॉ. अतुल भोसले दररोज साधताहेत कराडकरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद...समाजातील विविध घटकांना दिलासा देण्याचे महत्वपूर्ण कार्य; आस्थेने विचारपूस


कराड : कराड तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना व समाजातील विविध घटकांना दिलासा देण्याचे महत्वपूर्ण कार्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले करत आहेत. डॉ. भोसले दररोज समाजातील विविध घटकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत आहेत. 


          कोरानामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. यातच कराड तालुक्यात कारोनाग्रस्त रूग्ण आढळल्याने सर्वत्र भितीचे वातवरण पसरले आहे. या भयग्रस्त परिस्थितीतही अत्यावश्यक सेवा बजाविणारे पोलिस, शासकीय व वैद्यकीय कर्मचारी, तसेच अनेक समाजसेवी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेऊन कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. तसेच समाजातील वंचित घटकांसाठी अन्नसेवा व इतर प्रकारचे सहकार्य करत आहेत. या समाजातील विविध घटकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून डॉ. अतुल भोसले यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.


          डॉ. अतुल भोसले दररोज हा संवाद साधत असून, आत्तापर्यंत त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल सपना साळुंखे, लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश खुस्पे, कराड सॅटर्डे क्लबचे सेक्रेटरी रमेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी देशमुख मॅडम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व हॉटेल व्यावसायिक सागर बर्गे, अशोकराज उद्योग समूहाचे चेअरमन शरद चव्हाण, शासकीय फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर बुराडे, लेफ्टनंट दिग्विजय जाधव, उद्योजक रोहन मुखेडकर, भूषण शहा, जितू ओसवाल आदींशी संवाद साधला आहे.


या संवादावेळी डॉ. अतुल भोसले म्हणाले, की आपण समाजासाठी देत असलेली सेवा कौतुकास्पद असून, या सेवाकार्यामुळेच आज आपल्याला या संकटाचा सामना करणे शक्य आहे. पण सेवाकार्य बजाविताना स्वत:चीही काळजी घ्या. मास्क, हॅन्ड सॅनिटायझर अशा गोष्टींचा नियमित वापर करावा. ज्यांना या साधनांची आवश्यकता भासेल त्यांना कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून हे साहित्य पुरविण्याची ग्वाही त्यांनी दिली. डॉ. अतुल भोसले यांच्या या प्रयत्नांमुळे समाजात निस्वार्थी भावनेते कार्यरत असलेल्या लोकांचे मनोधैर्य उंचाविण्यास मदत होत आहे.