पोलीस दलाने कराड तालुक्यातील पारधी कुटुंबांना केले अन्नधान्याचे वितरण


पोलीस दलाने कराड तालुक्यातील पारधी कुटुंबांना केले अन्नधान्याचे वितरण


कराड - सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे संकल्पनेतून 'कोरोना'मुळे लाॅगडाऊन व जमावबंदी, संचारबंदीच्या काळात अन्नपाण्यासाठी भटकंती करणार्या पारधी कुटुंबांची उपासमार होऊ नये, यासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाचेवतीने सर्व पारधी कुटुंबांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे.पारधी मुक्ती आंदोलनाचे वतिने पोलीस दलातील "कर्तव्य कठोरता आणि माणुसकीच्या भावनेला" सलाम करण्यात येत असल्याचे पारधी कुटुंबांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


सातारा जिल्ह्यातील जवळपास ५७८पारधी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे.कराड शहर व कराड तालुका पोलिस स्टेशनचे हद्दीतील २३ पारधी कुटुंबांना अन्नधान्याचे वितरण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, यांचेसह स्थागुशा व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे, पारधी कुटूंब प्रमुख उपस्थित होते.पारधी कुटूंब प्रमुखांनी कोरोनाचे पाश्र्वभूमीवर खबरदारी घेत सामाजिक अंतर ठेवून धान्य स्विकारले.


Popular posts
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image