शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द


शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्द


कराड - मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराड यांच्यावतीने पाच लक्ष रुपयांचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.


जगभर थैमान घालेल्या कोरोना विषाणूची व्याप्ती देशात  तसेच महाराष्ट्रात होऊ लागली आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत त्यामुळे राज्याची आर्थिक घडी कोलमडली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी मदत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराड यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी ५ लाख रुपयेचा धनादेश पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपुर्थ केला.


याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), खजिनदार संजय बदीयानी, संचालक मानसिंगराव पाटील, संचालक राजेंद्र माने व इतर मान्यवर उपस्थित होते.


 


Popular posts
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image
सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image