सैदापूर येथील ८०० गरजू कुटुंबाना भार्गव चॅरिटेबल ट्रस्टची मोठी मदत


सैदापूर येथील ८०० गरजू कुटुंबाना भार्गव चॅरिटेबल ट्रस्टची मोठी मदत


माजी विधानसभा सहसचिव श्रीनिवास जाधव व माजी उपसरपंच मोहनराव जाधव यांची सामाजिक बांधिलकी


कराड - कोरोना विषाणूसारख्या भीषण परिस्थितीत गेली ४० दिवस घरी बसलेल्या सामान्य कष्टकरी कुटुंबांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. कराड शहरालगत असलेल्या सैदापूर -विद्यानगर परिसरात सुमारे १८ ते २० हजार नागरिकांचे वास्तव्य आहे, त्यातच बाहेरून आलेल्या कष्टकरी सामान्य मजुरांचे प्रमाण देखील मोठे आहे. हातावर पोट असलेल्या सैदापूर विद्यानगर परिसरातील ८०० कुटुंबाना मदत कारण्यासाठी सैदापूर येथील माजी विधानसभा सहसचिव श्रीनिवास जाधव साहेब व सैदापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव यांनी  पुढाकार घेतला असून भार्गव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यामातून व भारतीय जनता पार्टी सैदापूर यांच्या वतीने   सैदापूर विद्यानगर परिसरात गरजू कुटुंबाना गहू आट्टा, तांदूळ ,डाळी, तेल, चटणी अश्या जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले. 


सैदापूर येथील नंदीवाले वस्ती,बेघर, जुने बेघर , सोसायटी परिसर,   वस्ती परिसर, जुनेगाव येथील भीमनगर , मुस्लिम वस्ती, माळ  भाग, व विद्यानगर परिसरातील गरजू कुटुंबाना या साहित्याचे वाटप करण्यात आले.


सैदापूर गावचे सुपुत्र मंत्रालय सह सचिव म्हणून काम करीत असलेले श्रीनिवास जाधव यांची आपल्या मातीशी असलेली नाळ अधिक घट्ट केली. सैदापूर विद्यानगर परिसरात त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांना नेहमीच मदत केली आहे. विविध संस्थानी भार्गव चॅरिटेबल ट्रस्टला मदत केली असून या मदतीतून ८०० गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आणखी तीन टप्प्यात या गरजू कुटुंबाना जीवनावश्यक किट चे वाटप केले जाणार असून लॉक डाउन काळात भार्गव चॅरिटेबल ट्रस्ट ने केलेली हि मदत म्हणजे गरजू कुटुंबाना मोठा आधार असल्याचे मत लाभार्थी नागरिक व महिलांनी व्यक्त केले. 


आले गरिब मजुरांच्या मदतीला धावून....!


मंत्रालयात उच्च पदावर काम करणारे श्रीनिवास जाधव यांनी आत्तापर्यंत हजारो लोकांना मदत केली आहे. सध्या कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत साहेबांनी आपल्या मातृभूमीतील सामान्य कष्टकरी , शेतमजुरांना केलेली मदत नक्कीच प्रेरणादायी आहे. शासकीय अधिका-यांनी देखील श्रीनिवास जाधव यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपापल्या गावात परिसरात गरजूंना मदत करण्याची गरज निर्माण झाली‌ आहे.