पाच जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ...नऊ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल


पाच जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ...नऊ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल


सातारा: क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 5 कोरोना अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 9 नागरिकांना कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


  क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 4 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 3, कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे 2 नागरिकांना तीव्र जंतु संसर्गामुळे अशा एकूण 9 जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.