कापूस खरेदी केंद्रांना स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावेसहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना....मुंबई - कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणी संदर्भात आढावा बैठक 


कापूस खरेदी केंद्रांना स्थानिक प्रशासनाने सहकार्य करावेसहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना....मुंबई - कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणी संदर्भात आढावा बैठक 


मुंबई, दि.24 : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये काही अडचणी येत आहेत. त्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने खरेदी केंद्र आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.


आज मंत्रालयात राज्यातील कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कापूस खरेदी केंद्रांनी सोशल डिस्टिन्सींगसह आवश्यक त्या सर्व उपाययोजनासह नियमांचे पालन करुन कापूस खरेदी करावी. कापूस खरेदी केंद्रांना अडचणी संदर्भात आणि शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर कापूस घेवून जात असताना काही अडचणी असल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी असे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सांगीतले.


कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत शासन संवेदनशील असून लॉकडाऊनचा कालावधीतसुद्धा कापुस खरेदी केंद्रे सुरु केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.


बैठकीला पणन विभागाचे अपरमुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन विभागाचे उपसचिव का.गो. वळवी, सहकार मंत्र्यांचे खाजगी सचिव संतोष पाटील अविनाश देशपाडे ओ एस डी उपस्थित होते.


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image