आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी अधीक्षक धीरज पाटील यांची नियुक्ती
सातारा : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी, नर्सेस व इतर कर्मचारी अहोरात्र आपली सेवा देत असताना त्यांचेवर हल्ले होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वोच्च् न्यायालय रिट पिटीशन सिविल क्र.10795/2020 मध्ये आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावरील हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत तसेच त्यांना पुरेसे संरक्षण देण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्याकरीता नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित झाले आहेत.