कोरोनामुक्त युवक परतला घरी....क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी टाळ्यां वाजून दिला निरोप... चौथा रुग्ण बरा झाला
सातारा - आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून आज जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे हॉस्पिटलमधून घरी पाठवताना टाळ्यांच्या कडकडाट करून निरोप देण्यात आला.
मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांनी जी सेवा दिली आणि गंभीर आजारातून बरे केल्याबद्दल सदर युवकाने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. उत्तम आरोग्यासाठीच्या सदिच्छा घेतल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून हा युवक त्याच्या घरी गेला. पुढचे चौदा दिवस त्याला घरीच इतरांपासून अलिप्त ( होम कोरंटाईन ) राहावे लागेल.