जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात होणार ध्वजारोहण
कोल्हापूर :कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यातील महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 1 मे 2020 रोजी सकाळी ठीक 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री तथा राज्यमंत्री गृह (शहरे) सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे परिपत्रकामध्ये नमुद आहे.
सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास इतर अधिकारी/कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये. जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्ह्यात अन्य कोणत्याही ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्या येवू नये, असे ही श्री. गलांडे यांनी कळविले आहे.