राज्यपालांनी साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

 राज्यपालांनी साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद


पुणे - कोरोनाविरुध्दच्या लढयात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा खूप चांगले  काम करीत असून प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.


            विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी राज्यपालांनी राजभवन मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधत कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना, मदत कार्य यांचा यावेळी त्यांनी आढावा घेत मार्गदर्शन केले.


            राज्यपाल म्हणाले, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन, पोलिसदल, आरोग्य विभाग, एनजीओ तसेच अनेक सामाजिक संस्था हिरिरीने काम करत आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिक, कामगार, मजूर यांच्यापर्यंत मदतकार्य पोहचवण्याबरोबरच बेघर, बेरोजगारांच्या समस्यांचाही जलद निपटारा करावा. या सर्व घटकांना अन्न, निवारा, याबरोबरच औषधोपचार अशा सुविधा वेळेवर पोहचवाव्यात. सफाई कर्मचाऱ्यांची या परिस्थितीत मोठी भूमिका आहे. डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस, सफाई कर्मचारी यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे. त्यांना अधिक प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही यावेळी राज्यपालांनी दिल्या.


            पुणे विभागात कोरोना विषाणूच्या  प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. सद्यस्थितीची माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात आज अखेर एकूण 2450 बाधितांचे सॅम्पल्स घेतले. यापैकी 149 जण पॉझिटिव्ह व 2146 जण निगेटिव्ह आढळले आहेत. यापैकी 26 जण बरे होवून घरी गेले आहेत. मृत्यूंची संख्या 6 इतकी आहे. आजअखेर विभागातील एकूण 2444 संशयित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी 2150 व्यक्तींना सोडले असून 292 व्यक्ती अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. विभागातील दाखल झालेल्या 85 हजार 340 प्रवाशांपैकी 36 हजार 070 प्रवाशांचा फॉलोअप पूर्ण झाला असून अजून 49 हजार 270 प्रवासी शिल्लक आहेत.


            पुणे विभागात एकूण 21 कोरोना चाचणी सुविधा केंद्रे आहेत. विभागातील खाजगी, शासकीय हॉस्पिटलसाठी पीपीई कीट पुरवण्यासठी व्यवस्था केली असून हाफकीन संस्थेमार्फत या कीटची तपासणी व खात्री केली जात आहे. कामगार, मजूर, बेघर यांच्या सद्यस्थितीबद्दल सांगताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात मजूर स्थलांतरित कामगार व बेघर यांच्यासाठी कायमस्वरुपी 61 कॅम्प असून त्याची क्षमता 4360 व्यक्तींसाठी आहे. तर खाजगी कॅम्प 505 असून त्यामध्ये 26585 व्यक्तींची क्षमता आहे. असे विभागांतर्गत एकूण 566 कॅम्प असून त्याची क्षमता 30 हजार 945 इतकी आहे. कामगार, मजूर यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागातील साखर कारखान्यांच्यावतीने अन्न पुरविले जात आहे. इतर राज्यातील एकूण 246 व्यक्ती विभागात अडकलेल्या असून जिल्हा स्तरावरुन  त्याबाबत योग्य ती कार्यवाही सुरु आहे. विभागातील शेतीची कापणीची, काढणीची कामे सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावाबाबत  समस्या येवू नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बाजार समिती मार्फत भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ सुरु राहण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. दूधाच्या मागणीत झालेली घट लक्षात घेता दूधापासून  पावडर बनवण्याचे प्रमाण 40 टक्क्याहून 80 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. सर्व बाजार समित्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. भाजीपाल्याची आवक सुरळीत असून धान्याचा साठा पुरेसा असून तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले.


            दिल्ली मरकजवरुन परत आलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सध्या एकूण 661 व्यक्ती असून त्यापैकी 299  व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. 49 व्यक्ती या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात असून 205 व्यक्ती महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांमध्ये आहेत. अजून 107 व्यक्तींचा शोध सुरु आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 स्वयंसेवी संस्था, एनजीओ कार्यरत असून रिलीफ कॅम्प मधील व्यक्तींना 330 एनजीओ जेवणाची व्यवस्था पुरवित आहेत. लष्कराच्या सदर्न कमांडच्या सुविधा  राखून ठेवण्यात आल्या आहेत. जैविक कचऱ्याच्या योग्य निर्मूलनासाठी उपाययोजना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.


            यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती व उपाययोजनांची राज्यपालांना विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भविष्यात बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरुन उपाययोजना केल्या जात आहेत. आयसोलेशन व आयसीयू व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात येत आहे. डॉक्टर्स व स्टाफची पुरेशी संख्या असून त्यांना आवश्यक सुविधा, साहित्य पुरविण्यात येत आहे. सर्वसामान्यांना लॉकडाऊनमुळे त्रास होवू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील कामगारांच्या कॅम्पमध्ये असलेल्या कामगार, मजूर वर्गाला जेवण देण्यासाठी कामगार विभागाने व्यवस्था केली आहे. कामगारांचे स्थलांतर न होण्याबाबत दक्षता घेतली  जात आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली असून 145  एनजीओ मार्फत 1 लाख 15 हजार व्यक्तींना जेवण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिधापत्रिका नसलेल्यांसाठी सामाजिक संस्था, एनजीओ तर्फे  भोजन व्यवस्था केली आहे.  कोणतीही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांना दूध, भाजीपाला  अन्नधान्य यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले


Popular posts
सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कराड वार्तापत्र - गोरख तावरे जनशक्ती आघाडीमध्ये बंड झाल्याने गटात गट निर्माण जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या विविध समितींच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने कराड नगरपालिका राजकारणात हालचालीस प्रारंभ झाला आहे. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या गटाला स्वतंत्र बसण्यासाठी वेगळी जागा सभागृहात द्यावी, अशी मागणी केल्याने जनशक्ती आघाडीत फूट पडली. कराड नगरपालिकेच्या राजकारणातील गटात गट निर्माण झाल्याची चर्चा संपूर्ण शहरभर सुरू आहे. दरम्यान ऐतिहासिक कराड नगरपालिका राजकारणातील आघाड्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. यापूर्वीही अनेक वेळेला नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या विचाराच्या निवडून आलेल्या आघाड्यांमध्ये बंड झाले, फूट पडली अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना 25 विरुद्ध 24 अशी सदस्य संख्या होती. दरम्यान एका सदस्याने बंड पुकारून विरोधात गेल्यामुळे सत्ताधारी गट अल्पमतात आला होता. दरम्यान मुरब्बी राजकारणी असणारे पी. डी. पाटील यांनी एका दिवसात हे बंड मोडून काढले. आपला गेलेला सदस्य पुन्हा आपल्या गटात घेऊन आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणामुळे कराड नगरपालिकेतील सत्ताधारी जनशक्ती आघाडीमध्ये फुट पडली असे बोलले जात आहे. नगरपालिका म्हटले की, गट-तट, आघाड्या, कुरबुडी, देणे घेणे असे सर्रास घडत असते. जनशक्ती आघाडी फुटली, नगरसेवक घेत असलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे फुटीचे राजकारण हा मुद्दा ऐरणीवर आला.कराड शहरासाठी विकास निधी राज्य शासनाकडून येतो. हा विकास निधी विविध कामावर खर्च करीत असताना कामाचा दर्जा बिलकुल नाही, ठेकेदार दर्जाहीन कामे करतात, हे अनेक कामे पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे. दर्जाहीन विकास कामे होत असल्याने नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. मात्र याकडे नगरसेवक अथवा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही.यामुळे विद्यमान सत्ताधारी गटातील नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मुख्य पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवक कराड शहराच्या विकासाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी गटात गट केलेला कायम राहणार का ? सभापतीच्या निवडीवेळी "तलवार म्यान" होणार का ? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. कारण जयवंत पाटील उपनगराध्यक्ष झाल्यापासून सत्ताधारी गटाचा सर्व कारभार जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालला आहे. दरम्यान जयवंत पाटील यांनीच बंड पुकारल्यामुळे जनशक्ती आघाडीचे काय होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. जनशक्ती आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आणि उपनगराध्यक्ष जयंवत पाटील यांनी सभागृहात वेगळी बसण्याची मागणी केली. कराड नगरपालिका राजकारणाची दिशाच बदलली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यामध्ये समेट घडावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. विविध समितीच्या सभापतीची निवड करण्याचा अधिकार कोणाला ? आघाडीच्या अध्यक्षांना का नगरपालिकेतील गटनेत्याला ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान विविध समितीच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत राजेंद्र माने,महेश कांबळे, किरण पाटील यांना सभापती पदाची संधी मिळालेली नाही. यावेळेला सभापतीपदाची लॉटरी या तीन उमेद नगरसेवकांना लागेल का नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कराडच्या नगरसेवकांची भूमिका संभ्रमावस्थेत राहिली होती. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा कुणाला द्यायचा ? प्रचार कोणाचा करायचा ? याबाबत मात्र कराड नगरपालिकेतील नगरसेवकांचे लवकर एकमत झाले नाही. कराडच्या नगरसेवकांनी आपली भूमिका लवकर स्पष्ट केली नाही. विधानसभा निवडणुकीतील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत कराडमध्ये आजही चर्चा सुरू आहे.कराड नगरपालिकेला निवडून येणार्‍या नगरसेवकांची भूमिका कराड शहराच्या विकासाबाबत संवेदनशील हवी, मात्र सध्या ती दिसून येत नाही.  नगरपालिका निवडणुकीनंतर कराड नगरपालिकेमध्ये राजकीय तीन गट अस्तित्वात आले. यामध्ये लोकशाही आघाडी विरोधात बसली आहे. भाजपाचे काही नगरसेवक निवडून आले त्यांचा एक गट आहे. त्याचबरोबर सत्ताधारी म्हणून जनशक्ती आघाडी कारभार पाहत आहे. तर भाजपच्या नगराध्यक्षा स्वतंत्रपणे आपला कारभार करीत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या पाच नगरसेवकांचा वेगळा गट निर्माण केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा गट म्हणजे गटात गट निर्माण झालेला आहे. जनशक्ती आघाडीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बरोबर आता इथून पुढे आपला "घरोबा" असणार नाही असे सांगून त्यांनी कराड नगरपालिकेचा कारभार सुरू केला आहे. यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांना मांणणारे नगरसेवक आहेत. मात्र राजेंद्रसिंह यादव हे नगरपालिका राजकारणात, नगरपालिका कारभार चालवण्यासाठी जेवढा वेळ द्यायला हवा, तेवढा वेळ देत नाही, त्यामुळे नगरसेवकांनी अडचणी कोणासमोर मांडायच्या ? हा प्रश्नच आहे. अशी एकाकी पडलेले नगरसेवक आता एकत्रित सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला किती प्रतिसाद मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये गटातला गट शिल्लक राहतो का ? जनशक्ती आघाडीच्या छत्रछायेखाली निवडून आलेले सर्व नगरसेवक एकत्र राहणार का ? हे काही कालावधीनंतर स्पष्ट होईल.  जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विविध समितींच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. यावेळी गटातला गट अथवा जनशक्ती आघाडीची काय रणनीती राहणार हे पहावे लागेल. कराडमधील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्यासोबत महेश कांबळे, कश्मिरा इंगवले, माया भोसले, अरुणा पाटील हे नगरेसवक असल्याचा दावा केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे भाजपचे डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक आहेत. तर राजेंद्रसिंह यादव गट श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. त्यामुळेच आता नगरपालिका राजकारणात काय होणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीचे 16 नगरसेवक विजयी झाले. तर या आघाडीला एका महिला नगरसेविकेने पाठिंबा दिला. दरम्यान निवडून आल्यानंतर प्रथम जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वासघात केला आणि त्यांचे नेतृत्व झुगारून दिले. कराड नगरपालिकेत भाजपाचे पाच, लोकशाही आघाडीचे सहा तर बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीसह आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे कॉग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने असे गट कार्यरत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी राजीनामा द्यावा, असे बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीतील काही नगरसेवकांचे म्हणणे होते. दरम्यान उपनगराध्यक्ष पाच वर्ष माझ्याकडे राहील" या अटीवर "उपनगराध्यक्षपद घेतले असल्याचे जयंतराव पाटील सांगतात. यामुळे उपनगराध्यक्ष बदलाचा प्रश्नच येत नाही. यशवंत आघाडी राजेंद्रसिंह यादव यांची, जनशक्ती आघाडी अरुण जाधव यांची तर लोकसेवा आघाडी जयवंतराव पाटील यांची आघाडी आहे. या तिघे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. जयवंत पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्षपद असल्यामुळे नगरपालिकेत दररोज जयवंत पाटील दिसतात. अरुण जाधव नगरपालिकेकडे फिरकतही नाहीत. तर राजेंद्रसिंह यादव आपल्या कामाचा व्याप सांभाळून, जेवढा वेळ देता येईल तेवढाच वेळ देतात. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ते कोण सोडवणार ? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image
चहा नव्हे अमृततुल्य, कराडच्या युवकांचा अभिनव उपक्रम......शिवनेरी अमृततुल्य
Image