मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट चालक-वाहक तसेच सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांना भाजपाची मदत..देवेंद्र फडणवीस 


मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट चालक-वाहक तसेच सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांना भाजपाची मदत..देवेंद्र फडणवीस 


मुंबई - मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक, हॉकर्स, बेस्ट बसेसचे चालक आणि वाहक तसेच सिनेसृष्टीत काम करणाऱ्यांसाठी मदत सामुग्रीचे किट्स माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या-त्या क्षेत्रातील संघटनांकडे सुपूर्द करण्यात आले.


मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक आणि फेरीवाले, विक्रेते यांच्यासाठी अन्नधान्याच्या 30 हजार किट्स देवेंद्र फडणवीस यांनी कामगार नेते शशांक राव यांना प्रदान केल्या. एका परिवाराला लागणारा तांदूळ, गहू पीठ, डाळ, खाद्यतेल, साखर, चहा पावडर आणि मीठ अशी सामुग्री एका किटमध्ये आहे. अशा 30 हजार किट वाटपासाठी देण्यात आल्या आहेत.


बेस्टमध्ये काम करणारे चालक आणि वाहक (कंडक्टर) यांच्यासाठी सुरक्षेसाठी मास्क आणि इतर किट्स सुद्धा कामगार नेते शशांक राव यांना सुपूर्द करण्यात आल्या. या सुमारे 20 हजार मास्क किट्स आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत यावेळी आमदार प्रसाद लाड हे सुद्धा उपस्थित होते. मुंबईस्थित सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांसाठी अन्नधान्य, कडधान्य, तेल, चहा अशा 3000 किट्स भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे अध्यक्ष विजय सरोज आणि सरचिटणीस सत्यवान गावडे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केल्या. सध्या संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने गरिबांची गैरसोय होऊ नये, म्हणून भाजपाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


*