पंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत


पंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत


पुणे - कोरोनाच्या भीषण आपत्तीवर मात करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस  पुण्यातील इंडो शॉट ले या कंपनीचे अध्यक्ष विजय पुसाळकर  यांनी आज १ कोटी रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द केला.


कोरोनाच्या भीषण संकटातून सावरण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून श्री. पुसाळकर यांनी ही मदत पंतप्रधान सहायता निधीस सुपूर्द केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिएशनचे विकास काकतकर,पुना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील,निवृत्त पोलीस उपायुक्त सुरेश केकाण उपस्थित होते.


कोरोनाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून याप्रसंगी दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहे, हे समाजातील सकारात्मकतेचे प्रतीक असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर यांनी अधिकाधिक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.


आजवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ लाख ६७ हजार तर पंतप्रधान सहायता निधीसाठी ३ लाख ६६ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जमा झाला आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना वनराईतर्फे शिधावाटप
Image
डॉ. अतुल भोसले यांचा विरोधकांना सवाल...इतरांच्या नावावर बोगस कर्ज का घेतले ? त्यांना तुरूंगात का जावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे हिंमत असेल तर द्यावीत 
Image
सातारा - पुणे महामार्गावरील खड्डे 15 मार्चपर्यंत बुजवावेत.....पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील रस्ते कामांचा आढावा
Image
  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा
Image