गावपातळीवरील कृती समितीकडून वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन


गावपातळीवरील कृती समितीकडून वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन


सातारा : राज्यात कोविड-19 या विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये या करिता ग्रामीण भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ग्रामपातळीवर राबविण्याची व पार पाडावयाची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.


                ग्रामणी भागामध्ये काम करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी अथवा वैद्यकिय क्षेत्राशी निगडित  काम करणारे सर्व कर्मचारी यांची त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणापासून कर्तव्याच्या ठिकाणी  जाणे-येणे होत आहे. अशा सेवक-सेविकांना गावामध्ये प्रवेश नाकारत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर गठीत गाव समिती, ग्रामस्थ यांनी कोणत्याही प्राकारचा अडथळा करु नये, उलट कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वैद्यकिय क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अत्यावश्यक बाबींकरीता पुरेसा वेळ देता येत नसल्याने, त्यांच्या दैनंदिन गरजा, अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी गावपातळीवरुन संबंधित कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य, मदत होणे गरजेचे आहे.


                अशा कर्मचाऱ्यांना कोणकडूनही कोणतही प्रकारची अडवणूक, दमदाटी केली जाणार नाही अथवा संबंधित कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी गठीत करण्यात आलेल्या ग्रामपतळीवरील कृती समिती यांचेवर राहील. अडवणूक करणाऱ्या ग्रामस्थांवर गठीत ग्रामसमितीने कठोर कारवाई करावी. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित ग्रामपातळीवर गठीत करण्यात आलेल्या समितीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एका परिपत्रकानुसार कळविले आहे.


                वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गानेही कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेऊ नये. संबंधितांना आपआपल्या कार्यक्षेत्रात मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर इ. चा वापर करणे व सोशल डिस्टन्सींगचा वापर करावा.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
कृष्णा हॉस्पिटल, डॉ. सुरेश भोसले, अतुल भोसले यांची बदनामी करणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल....भामट्याचे नाव उघड करा पत्रकारांची मागणी 
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
स्वखर्चानी शिवभक्तांनी केला शंभू महादेव मंदिराचा जीर्णोद्धार
Image