"जनकल्याण"चा आर्थिक वर्षाअखेर रु.७८४ कोटींच्या एकत्रित व्यवसायासह रु.८ कोटी ७१ लाखाचा नफा - चंद्रशेखर देशपांडे


"जनकल्याण"चा आर्थिक वर्षाअखेर रु.७८४ कोटींच्या एकत्रित व्यवसायासह रु.८ कोटी ७१ लाखाचा नफा - चंद्रशेखर देशपांडे


कराड - जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराडने सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये
असलेल्या मंदी सदृश्य वातावरणातही रक्कम रु.४९०.६३ कोटी ठेवी आणि रक्कम रु.२९३.१४ कोटी कर्जाचे माध्यमातून एकत्रित व्यवसाय रु.७८४ कोटी पूर्ण केला आहे. संस्थेची एकूण गुंतवणूक रु.२६२.९२ कोटी इतकी झाली आहे. वर्षाअखेरीस संस्थेस ढोबळ नफा रु.९.९८ कोटी इतका झाला असून सर्व तरतूदीअंती रु.८ कोटी ७१ लाख एवढा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर देशपांडे यांनी दिली.


आर्थिक वर्षाच्या अंतिम टप्प्यात कोरोना व्हायरसमुळे वसूलीवर विपरीत परिणाम होऊन देखील संस्थेने आपला ढोबळ एन.पी.ए. सहकार खात्याच्या निर्देशांनुसार मर्यादेत राखण्यात यश मिळविले आहे. संस्थेने कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सामाजिक जाणिवेतून स्वतःहून रक्कम रु.१० लाख इतके आर्थिक सहकार्य प्रधानमंत्री केअर फंड व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेले आहेत. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी देखील आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन रक्कम रु. ७१ हजार इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेला आहे. तसेच पुढील आवश्यकतेनुसार संस्था अधिकचा निधी देईल.


संस्थेने मागील सलग ८ वर्षे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या कर्जदारांना व्याजदरात १ टक्का रिबेट दिलेला आहे. त्याचा निश्चित लाभ नियमित कर्जदारांना मिळत आहे. मागील आर्थिक वर्षात नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदारांच्या रिबेटची रक्कम लवकरच त्यांच्या सेव्हिंग्ज, चालू ठेव खाती जमा होईल. गतवर्षाखेर दिलेल्या रिबेटची एकूण रक्कम सुमारे रु.६ कोटी १४ लाख इतकी आहे. सन २०२०-२१ यावर्षी देखील आपली कर्ज खाती नियमित ठेवून रिबेट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.मिलींद पेंढारकर यांनी केले आहे.


संस्थेच्या इ-सेवा विभागामार्फत मागील ७ वर्षांपासून आपण आर.टी.जी.एस.,एन.ई.एफ.टी. तसेच शासकीय कर भरणा, वीज बील, टेलिफोन बील भरणा व डी.टी.एच. रिचार्जची सुविधाही संस्थेच्या सभासद ग्राहकांकरीता उपलब्ध करून दिली आहे. यास सभासद व नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेने सुमारे रु.१२ कोटी इतक्या रकमेचे कर संकलन केलेले आहे. आपण आपल्या खात्याची स्थायी सूचना संस्थेकडे दिल्यास आपले वीज बील व फोन बील निःशुल्क विनासायास भरले जाईल, असेही यावेळी सांगितले.