स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना त्वरित शिधा द्यावा : मंत्री बाळासाहेब पाटील....कराड येथील स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांशी साधला सवांद


स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना त्वरित शिधा द्यावा : मंत्री बाळासाहेब पाटील....कराड येथील स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांशी साधला सवांद


कराड - स्वस्त धान्य दुकानातून शासनाच्यावतीने पुरवला जाणारे धान्य लवकरात लवकर लाभार्थींना देण्याच्या दृष्टीने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात एकपेक्षा अधिक तराजू ठेवण्यात यावेत आणि लाभार्थींना शासनाच्यावतीने दिला जाणारा शिधा देण्यात यावा अशा सूचना सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. रेशन दुकानात गर्दी होऊ नये. यासाठी केलेल्या उपाययोजने संबंधी माहिती घेण्यासाठी पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी चालत फेरफटका मारताना नेहरू चौकातील कराड कंझ्युमर्स स्टोअर रेशन दुकानास अचानक भेट दिली. 


स्वस्त धान्य दुकानातून रेशन वितरणाचे काम सुरू होते.याठिकाणी अचानकपणे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. दुकानाचे मालक किसनराव पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या नागरिक व महिलांशीही चर्चा केली.स्वस्त धान्य दुकानातून दिला जाणारा शिधा योग्य मिळतो का नाही याबाबत त्यांनी लाभार्थींची चर्चा केली.


दरम्यान स्वस्त धान्य दुकानासमोर उभ्या असणाऱ्या लोकांना उन्हात न थांबता सोशल डिस्टन्स ठेवून सावलीत बसण्याच्या सूचना केल्या. दुकानासमोर गर्दी होऊ नये. यासाठी दुकानातील वजन काटे वाढवून तातडीने रेशन देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडून रेशनबाबत सविस्तर माहिती घेतली.