चाटे शिक्षण समूहाची कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांसाठी "लर्न फ्रॉम होम" योजना : प्रा. डॉ. भारत खराटे


चाटे शिक्षण समूहाची कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांसाठी "लर्न फ्रॉम होम" योजना : प्रा. डॉ. भारत खराटे


कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांसाठी चाटे शिक्षण समुहाच्यावतीने 'लर्न फ्रॉम होम' हीऑनलाईन शिक्षण देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व सोलापूर या जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते दहावी (स्टेट बोर्ड व सीबीएसई) आणि अकरावी व बारावी (सायन्स) शाखेतील विद्यार्थ्यांना होणार आहे.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सगळीकडेच 'लॉकडॉऊन' सुरू असल्यामुळे उपरोक्त सर्व जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये बंद आहेत. शासनाच्या आदेशामुळे सर्व ठिकाणी अध्यापनाचे कामकाज पूर्णपणे बंद आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा व त्यांच्या अभ्यासक्रमाचा विचार करता या विद्यार्थ्यांसाठी चाटे शिक्षण समुहाने 'लर्न फ्रॉम होम' ही योजना सुरू केली आहे.


या योजनेतील विविध उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती देताना चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे म्हणाले की, यामध्ये इयत्ता आठवी ते दहावी (स्टेट बोर्ड व सीबीएसई) आणि इयत्ता अकरावी व बारावी (सायन्स) या वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दररोज इंग्रजी, सायन्स, गणित, भाषा विषयांचे व्याकरण, सामाजिक शास्त्रे हे विषय आठवी ते दहावीसाठी व फिजीक्स, केमेस्ट्रि, बायोलॉजी व मॅथ्स हे विषय अकरावी - बारावीसाठी दररोज ऑनलाईन अध्यापन पद्धतीने शिकविले जातील. शिकण्यासोबतच दर आठवड्याला युनिट टेस्ट, मार्गदर्शक नोट्स, असायनमेंट्स आणि होमवर्कही विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना हे सर्व वर्क करताना ज्या शंका येतील त्या शंकांचेही योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.


प्रा. डॉ. भारत खराटे या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना पुढे म्हणाले की, सध्या उपलब्ध असलेली विज्ञान - तंत्रज्ञानाची विविध साधणे, चाटे शिक्षण समुहाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक यांच्या अथक परिश्रमातून ही योजना हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार आहे व त्याचा लाभ त्यांना होणार आहे. सध्याच्या शिक्षणपध्दतीनुसार विशेषत: बारावी सायन्सनंतरच्या विविध व्यावसायिक कोसेंसना जसे - आयआयटी, मेडिकल, इंजिनिअरींग, आर्किटेक्ट, अॅग्रीकल्चर, फार्मसी आदि कोर्सेसना ऑनलाईन प्रवेश परीक्षा देऊनच प्रवेश घ्यावा लागतो. त्यासाठीसुद्धा अकरावी-बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी, मेडिकल, जेईई (मेन्स आणि अॅडव्हान्स), नीट (मेडिकल एन्ट्रान्स), एमएचटी-सीईटी आदि राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रवेश पूर्व परिक्षांची तयारीही या 'लर्न फ्रॉम होम' उपक्रमातून करवून घेतली जाणार आहे.


चाटे शिक्षण समुहाच्या क्लासेस, ज्युनि. कॉलेज, आयआयटी-नीट सेंटर, स्कूल आणि समर व्हेकेशन प्रकल्पातील सर्व विद्यार्थ्यांनी व नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी-पालकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी ९३७१६११४८५, ९३२६६१४४४० या मोबाईलवर किंवा चाटे समुहाच्या आपल्या
शहरातील जवळच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले आहे