जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांचे समुपदेशन

 


जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांचे समुपदेशन


सातारा : यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, सातारा के.एन.पी. महाविद्यलय, शिरवळ व पाच पांडव आश्रमशाळा अलगुडेवाडी ता. फलटण येथे लॉक डाऊनमुळे परराज्यातील नागरिकांची राहण्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे. या नागरिकांचे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत गटसमुपदेशन व वैयक्तिक समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच त्यांचे मानसिक व भावनिक समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायाचा यासाठी वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टिसिंग, सॅनिटायझर, साबण, मास्क वापराचे महत्व तसेच योग्य पोषण आहाराबाबत माहिती देण्यात येत आहे.  योगासन वर्ग तसेच आठवड्यातून एकदा तज्ञ व्यक्तीकडून आरोग्य विषयक तसेच योग्य जीवनशैलीबाबत व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे.