भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केले विनम्र अभिवादन


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना


गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केले विनम्र अभिवादन


 कराड - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण येथील तहसिल कार्यालयात त्यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन विन्रम अभिवादन करण्यात आले.


         यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी, नायब तहसिलदार प्रशांत थोरात हे शासकीय अधिकारी व माजी पंचायत समिती सदस्य प्रकाशराव जाधव, बबनराव भिसे यांची उपस्थिती होती.


        फक्त वही-पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुध्दीला सत्याकडे,भावनेला माणुसकीकडे,शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण ही शिकवण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी शिकवण दिली आहे.आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती साजरी होत असून कोरोनाच्या संकटामुळे जयंतीचा कार्यक्रम साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले असून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे १२९ व्या जयंतीनिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तसेच महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेच्या वतीने मी विन्रम अभिवादन करतो असे ना. शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image