१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध

१५ एप्रिल नंतर मोफत तांदुळ होणार उपलब्ध


सातारा : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थी (सदस्य) व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्य यांना प्रति सदस्य 5 किलो प्रमाणे तांदूळ माफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्डधारकाने (प्राधान्य कुटुंब लाभार्थी) (सदस्य) व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्य) नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला (प्राधान्य कुटुंब लाभार्थी  (सदस्य)) व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्य ) नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ साधरणात: 15 एप्रिल नंतर पात्र कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार  (प्राधान्य कुटुंब लाभार्थी (सदस्य) व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्य) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम पुणे यांच्याकडून प्राप्त करुन घेतले जात आहे. 15 एप्रिल नंतर टप्याटप्याने पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरु करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य मे आणि जून मध्ये सुद्धा त्या त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.


जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई


जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत.जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस विभाग यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले असल्याची माहितीही जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली.


Popular posts
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
सातारा जिल्ह्यातील नागरिकांचा लॉकडॉऊनला चांगला प्रतिसाद : पालकमंत्री बाळासाहेब पाटील 
Image
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार
Image