जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली...सातारा जिल्हयात कोरोना केअर सेंटर सुरु

 


जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली...सातारा जिल्हयात कोरोना केअर सेंटर सुरु


 सातारा  - जगभरात व भारतात मोठया प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून   महाराष्ट्रामध्येही रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. या कोरोना व्हायरस मध्ये सातारा जिल्हयातही कांही दिवसापासून संशयीत रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली असून त्या वरील उपाययोजना  म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोरोना केंअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.


सातारा जिल्हयात कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आली असून या  सेंटर मध्ये संशयीत कोरोना रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. या रुग्णामध्ये आय. एल. आय. (सर्दी, ताप, खोकला सदृष्य लक्षणे) व सारी (तीव्र सर्दी, ताप, खोकला असणारे रुग्ण ज्यांना दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता आहे) या बाबतच्या रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. या मधील ज्या रुग्णामध्ये  सारीची लक्षणे आढळून येत आहेत त्यांना कोरोनाच्या तपासणी करीता सातारा जिल्ह्यात कोरोना केअर सेंटर स्थापना करण्यासाठी आली आहे त्या ठिकाणी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या करीता सामान्य रुग्णालय सातारा (सातारा व जावली), उपजिल्हा रुग्णालय कराड (कराड व पाटण), ग्रामीण रुग्णालय वाई (वाई, खंडाळा व महाबळेश्वर), ग्रामीण रुग्णालय कोरेगांव (कोरेगाव व खटाव) व उप जिल्हा रुग्णालय फलटण (फलटण, माण) येथे कोरोना केअर सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे व या ठिकाणी संबंधीत रुग्णांच्या  घाशातील स्त्रावांचे नमुने घेवून तपासणीसाठी पुढे पाठविले जाणार आहेत.


कोरोना संसर्गाचे गांभीर्य ओळखून होम क्वारंटाईनमध्ये रहावे. तसेच सर्दी, ताप, खोकला झाल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क करुन आरोग्य तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन त्यावर त्वरीत उपचार करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी संजय भागवत यांनी सांगितले आहे.


जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना,  रुग्ण तपासणीकरीता डॉक्टरांना फेस शिल्ड, पीपीई किट, एन 95 मास्क, ट्रीपल लेअर मास्क व सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात वाटप करण्यात आलेले आहे. या साहित्यांची जिल्ह्यात कमतरता होणार नाही याची जिल्हाधिकारी शेखर व सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी  संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले आहे.


Popular posts
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचा पहिला टप्पा मार्च - २०२१ पर्यंत कार्यान्वित होणार...किवळ व खोडजाईवाडीचा प्रस्ताव द्यावा
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image