असा मिळतोय घरपोच भाजीपाला, फळे व किराणा


असा मिळतोय घरपोच भाजीपाला, फळे व किराणा


जालना - कोरोना पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात शहरवासियांची अन्नधान्य, फळे व भाजीपाला खरेदीसाठी होत असलेली परवड पाहता ग्राहकांना घरपोच घाऊक दरात सेवा मिळावी यासाठी हॅपी इंडियन मार्टने सेवा सुरु केली आहे. प्रायोगिक तत्वावर जालना शहरात हॅप्पी इंडियन मार्टकडून सध्या ग्राहकांना घरपोच ताजी फळे, भाजीपाला व अन्नधान्य पुरवठा सेवा देण्यात येत असुन जालना शहरातील ग्राहकांनीही कंपनीच्या या उपक्रमास पसंती दिल्याचे आढळून येत आहे.


शेतकरी व ग्राहक यांच्यातील वितरण व्यवस्थेत अनेक टप्पे असल्याने फळे, भाजीपाला व अन्नधान्यासाठी शहरातील ग्राहकांना जी अतिरिक्त किंमत मोजावी लागत होती त्यास आता आळा बसत असुन ग्राहकांना वाजवी किमतीमध्ये घरपोच वस्तु उपलब्ध होत आहेत. सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन करीत कंपनीद्वारा घरपोच सेवा दिली जात आहे. येत्या 14 एप्रिल रोजी हॅप्पी इंडियन मार्टचे स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन व संकेतस्थळ  https://happyindianmart.com/   सुरु होत असुन ग्राहकांना मोबाईल व इंटरनेट वरुन फळे, भाजीपाला व किराणा ऑर्डर करता येणार आहे.


सर्व तालुक्यात शाखा


जालना जिल्ह्यातील बदनापुर, अंबड, भोकरदन, परतुर, मंठा, जाफराबाद, घनसावंगी या तालुक्यातही हॅप्पी इंडियन मार्टच्या शाखा सुरु होत असल्याने या शहरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. शिवाय शेतकर्‍यांनाही मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून लस विकसित
Image
6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह 14 जण निगेटिव्ह तर 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा परिषद पाझर तलावांची ठेका रक्कम कमी करावी..... सातारा जिल्हा मत्स्यव्यवसाय संघाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन  
Image
पुरोगामित्वाची बूज राखणारा साक्षेपी संपादक हरपला.... अनंत दीक्षित यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
Image