118 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 86 जण विलगीकरण कक्षात दाखल

 


118 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 86 जण विलगीकरण कक्षात दाखल


कराड : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 65, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 43 व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 7 असे एकूण 118 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.


काल दि. 8 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 73 असे एकूण86  जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.