फलटणची महिला कोरोनामुक्त.. आज दिला डिस्चार्ज 145 जणांचे कोरोना नमुने निगेटिव्ह तर 166 विलिनीकरण कक्षात दाखल

 


फलटणची महिला कोरोनामुक्त.. आज दिला डिस्चार्ज 145 जणांचे कोरोना नमुने निगेटिव्ह तर 166 विलिनीकरण कक्षात दाखल


कराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेली फलटण येथील कोरोना बाधित महिलेचे आज चौदा दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. आता ती कोरोनामुक्त झाल्याने तिला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या एकूण 9 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


तसेच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 42, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 77, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 21, तसेच कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 5 अशा एकूण 145 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. 


तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 27 (आरोग्य कर्मचारी-12, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-1, कोविड बाधित रुग्णांचा निकट सहवासित-9, गरोदर माता-5), कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 4 (कोरोना बाधिताचे निकट सहवासित-3, कोरोना बाधित रुग्णाचा चौदा दिवसानंतरचा नमुना-1), वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 74 (आरोग्य कर्मचारी-24 कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-35, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 1, गरोदर माता-12, प्रवास करुन आलेले-2), उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 32 (आरोग्य कर्मचारी-1, कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-28, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे-3,) ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 3 (आरोग्य कर्मचारी), ग्रामीण रुग्णालय वाई येथे 26 (कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित-26, अशा एकूण 166 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 


या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.