*171 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; बाधित महिलेसह अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती*

 


*171 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; बाधित महिलेसह अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती*


*तर 54 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला* 


कराड : एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्या प्राप्त अहवालानुसार एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.



  1. *बाधित महिलेस अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती*


काल दि. 24 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित 24 वर्षीय महिलेचे सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत. तसेच आज पहाटे 3.30 वाजता कंटेन्मेंट झोन भिमनगर, कोरेगाव येथील 22 वर्षीय महिलेची सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुरक्षित असून आईच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.


*54 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला* 


काल दि. 24 मे रोजी रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 46 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथे 8 असे एकूण 54 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुना एन.सी.सी.एस, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.