‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा


‘कृष्णा’च्या रोगनिदान प्रयोगशाळेला ‘कोविड-19’च्या टेस्ट करण्यास मान्यता....आता कराडमध्येच होणार कोरोना चाचणी; सातारा जिल्यातील एकमेव प्रयोगशाळा


कराड : ‘कोविड-19’ची चाचणी करण्यास येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कराडमध्येच ‘कोविड-19’च्या चाचण्या होणार असून, रूग्णांचे रिपोर्ट लवकर मिळणे शक्य होणार आहे. ‘कोविड-19’ चाचणीसाठीची सातारा जिल्ह्यातील ही एकमेव प्रयोगशाळा आहे.


कोरोना साथीचा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलने पूर्वीपासूनच पुढाकार घेऊन काम सुरू केले आहे. हॉस्पिटलमध्ये संशयित रूग्ण आणि पॉझिटिव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची निर्मिती, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स व अन्य स्टाफ आणि कोरोना बाधित रूग्णांची घेतली जाणारी विशेष काळजी यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रूग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या 4 पेशंटना डिस्चार्ज देण्यात आला असून, यामध्ये 10 महिन्याच्या बालकाचा आणि 78 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.


सातारा जिल्ह्यात ‘कोविड-19’ची चाचणी करण्याची सोय उपलब्ध नसल्याने संशयित रूग्णांचे स्वॅब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले जायचे. या प्रयोगशाळेवर मोठा ताण असल्याने किमान दोन दिवसानंतर रिपोर्ट उपलब्ध होत होते. त्यामुळे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेस ‘कोविड-19’ची चाचणी करण्यास मान्यता मिळावी, यासाठी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले सुरवातीपासून आग्रही होते. ‘कोविड-19’च्या चाचण्या येथेच होऊ लागल्यास लवकर निदान होऊन तातडीने योग्य उपचार सुरू करणे शक्य होईल, तसेच रिपोर्टसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेवर विसंबून राहावे लागणार नाही, ही त्यामागची भूमिका होती.


त्यानुसार कृष्णा हॉस्पिटल प्रशासनाने गेल्या महिन्याभरापासून नवी दिल्ली येथील भारतीय  वैद्यकीय संशोधन परिषद आणि नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडे पाठपुरावा सुरू केला होता. तसेच हॉस्पिटल प्रशासनाने 9 एप्रिल 2020 रोजी याबाबत पत्रव्यवहारही केला होता. कृष्णा हॉस्पिटलची रोगनिदान प्रयोगशाळा एन.ए.बी.एल. मानांकीत असून, याठिकाणी ‘कोविड-19’ ची चाचणी करण्यास आवश्यक ती सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ स्टाफ असल्याने या प्रयोगशाळेला ‘कोविड-19’ची चाचणी करण्याची परवानगी देत असल्याचे पत्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने हॉस्पिटल प्रशासनास पाठविले आहे.


याबाबतची योग्य ती तांत्रिक पूर्तता झाल्यानंतर लवकरच या चाचण्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या रोगनिदान प्रयोगशाळेत प्रारंभ केला जाणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image