पुणे कारागृहातुन आलेले 2 जणांसह 5 बाधित..आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्णांची संख्या

पुणे कारागृहातुन आलेले 2 जणांसह 5 बाधित..आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्णांची संख्या


कराड -: कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 15, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे कारागृहातून सातारा येथे प्रवास करुन आलेले 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे बाधित रुगणाच्या निकट सहवासित 1 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे कराड येथून प्रवास करुन आलेला 1 असे एकूण 19 जणांचे अहवाल कोविड-19 बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 


आता सातारा जिल्ह्यात 64 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्ण आढळले आहेत.


तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 20, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 10, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 12, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 व वाई येथील 1 असे एकूण 64 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.