कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त पेशंटना टाळ्यांचा गजरात डिस्चार्ज

 



कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त पेशंटना टाळ्यांचा गजरात डिस्चार्ज


कराड : येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या बाबरमाची आणि चरेगाव येथील दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.


बाबरमाची येथील 32 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो 18 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात 17 एप्रिल रोजी चरेगाव येथील एका 30 वर्षीय युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला पुढील उपचारासाठी 25 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.


या दोघांवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे दोन्हीही रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. 


कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी या कोरोनामुक्त तरुणांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना हॉस्पिटलमधून निरोप दिला.


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश