कराड येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह..244 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 134 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


कराड येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह..244 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 134 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


कराड : कराड येथील एका निकट सहवासिताचा अहवाल  कोरोना बाधित (कोविड-19 ) आला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर  यांनी दिली आहे.


244 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 83, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 145, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 असे एकूण 244 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


134 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 26, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 72, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 15 व वाई येथे 21 असे एकूण 134 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.


जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 115 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 93, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 20, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण  आहेत.