कराड 3 सातारा 1 जण कोरोना बाधित.. 25 निगेटिव्ह, 24 विलगीकरण कक्षात
कराड : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे गुजरात येथून प्रवास करुन आलेला 1 व वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथे कोरोनाबाधित रुग्णाचा 1 निकट सहवासित तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे 2 निकट सहवासित असे एकूण 4 नागरिक कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सध्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 24, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 30 असे एकूण 64 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 62 रुग्ण लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित दोन रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.
25 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह
सातारा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 2 आणि उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 5, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 18 संशयित रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले.
24 नागरिक विलगीकरण कक्षात
आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 24 (प्रवास करुन आलेले 23, श्वसनसंस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गाचे 1) नागरिकांनरा विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या 24 नागरिकांचे व कोरोनाबाधित 2 रुग्णांच्या 14 दिवसानंतरचे घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 133 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 65 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 66 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.