3 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह....23 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 130 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

 


 3 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह....23 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 130 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


कराड : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणारी 2 वर्षीय मुलगी व 68 वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारी 70 वर्षीय महिला अशा एकूण 3 निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


23 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 व उपजिल्हा रुग्णालय,फलटण येथील 10 असे एकूण 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


130 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


6 मे रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 7, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 102, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 21 असे एकूण 130 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 79, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 14, कोरोना बाधित मृत्यु- 2 तसेच जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 95 इतकी आहे.


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश