58 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

 


58 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल


सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 29 (आरोग्य कर्मचारी-3, कोरोनाबाधितांचे निकट सहवासित-14, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-3, कोरोना बाधित परिसरातील गरोदर माता-6), कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 4 (श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-4), वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 25 (आरोग्य कर्मचारी-7 कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-16, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 1, गरोदर माता-1,), अशा एकूण 58 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


या 58 नागरिकांबरोबर कोरोना बाधित रुग्णांचे चौदा दिवसानंतरचे नमुने-4, आरोग्य कर्मचारी आठ दिवसांनंतरचे नमुने-2 अशा 64 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.