वनवासमाची, मलकापूर, आगाशिवनगर येथील कोरोना प्रादुर्भावची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन शंभर टक्के पाळा - पालकमंत्री बाळासाहेब पाटील


वनवासमाची, मलकापूर, आगाशिवनगर येथील कोरोना प्रादुर्भावची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन शंभर टक्के पाळा - पालकमंत्री बाळासाहेब पाटील


कराड :  कराड तालुक्यातील वनवासमाची, मलकापूर, आगाशिवनगर येथे दाट लोकवस्ती असल्याने तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेथील कोरोनाची साखळी तोडणे आव्हान असून ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊन शंभर टक्के पाळला पाहिजे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका घरोघरी जावून माहिती घेत आहेत. त्यांना पूर्ण, योग्य माहिती सांगून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केले आहे.


कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या  डॉक्टर व कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घ्यावी.  कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र निवासस्थान उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देणार असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.  


 लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी मुंबई, पुण्यातून अनेक लोक आले आहेत, अजूनही पुण्या-मुंबईसह राज्यातील तसेच पर राज्यात  जिल्ह्यातील लोक आहेत. त्यांची माहिती घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. कोणाला कोणत्या जिल्ह्यात जायचे आहे, त्याबाबतची माहिती ऑनलाइन भरुन घेतली जात आहे.  अनेक परप्रांतीय मजुरांना ऑनलाईन माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष उभा करण्यात आला असल्याचीही माहिती पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली


Popular posts
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेतला कोल्हापुर परिक्षेत्रातील.....विशेष पोलीस महानिरीक्षक व पाच जिल्हयातील पोलीस अधीक्षकांचा आढावा.
Image
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर
Image
अंत्योदय व केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी ) कार्डधारकांना मोफत तांदूळ वाटप सुरू : तहसीलदार अमरदीप वाकडे 
Image
कराड नगरपालिका व महिला व बालकल्याण समिती..... महिला सक्षमीकरण सकारात्मक चांगले काम
Image
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश