नगरसेवक विजय वाटेगावकर यांचे सामाजिक बांधिलकी...वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत


नगरसेवक विजय वाटेगावकर यांचे सामाजिक बांधिलकी...वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत


कराड : कोरोनाचे संकट काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत. त्याचप्रमाणे कराड नगरपरिषदेचे नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी ११,००० रुपयेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.


यावेळी नगरसेवक सौरभ पाटील, जयंत बेडेकर, ललित राजापूरे, अमित सुर्यवंशी आदी उपस्थित होते.


कोरोना (कोविड १९)विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाउन वाढवला असून सरकारच्या उत्पन्नच्या स्रोतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्थांमार्फत व वैयक्तिक पातळीवर मदत केली जात आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्याबरोबर राज्यातून अनेक सामाजिक व्यवसायिक संघटना व व्यक्तिगत दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपूर्द करीत आहेत.