स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा


स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड जाहीर करावे,... डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला... "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा


कराड : कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय नॉन कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांना कराड नगरपालिकेच्या नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. दरम्यान संदर्भातील परिपत्रक ३० एप्रिल २०२० चे आरोग्य सेवा संचालनालयाचे पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. सदर रुग्णालय नॉन कोविड म्हणून घोषित करावे व त्याची कोविड रुग्णालय‌ म्हणून असलेली मान्यता रद्द करावी अन्यथा ११ मे पासून कराडकरांना कोरोनाग्रस्त परिस्थिती असूनही ररत्यावर उतरून जनअंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची जनशक्ती विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक गजेंद्र कांबळे, निशांत ढेकळे यांनी भेट देऊन निवेदन दिले.


सातारा जिल्ह्यातील कराड ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे. या कराड नगरीची लोकसंख्या सुमारे १ लाख इतकी आहे. या गावात स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय आहे ( पूर्वा श्रमीचे काटेज हॉस्पिटल ). सध्या संपूर्ण देश आणि महाराष्ट्र राज्य कोरोना हा भीषण विषाणू निर्माण झालेल्या महामारीशी निकराने झुंज देत आहे. या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांना दाखल करायच्या हॉस्पिटलसाठी शासनाने काही निकष निर्देशित केले आहेत. या निकषाचे पालन कोविड रुग्णालयांनी कसोशिने पालन करण्याची आवश्यकता आहे. सुरुवातीस कोरोनाने बाधित झालेल्या सांगली जिल्ह्यातील मिरज येथे ना. जयंत पाटील साहेब यांच्या मागदर्शनाखाली अशा रुग्णालयाची निर्मिती तातडीने केली गेली व यासाठी मुंबईहून तज्ञ डॉक्टरांची समितीही आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाची उभारणी झाली आणि तेथे यशस्वीपणे कोरोना
ग्रस्तांवर उपचार झाले. 


सांगली शेजारी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड येथे मात्र यापैकी कोणतेही निकष न पाळणाऱ्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून मान्यता मिळाली २० एप्रिल २०२० पासून येथे रुग्ण दाखल व्हायला सुरुवातही झाली व या ठिकाणी कोरोना तपासणीसाठी स्वॅबचे नमुने घेतले जाऊ लागले. सदर रुग्णालयातील मुलभूत वैधकीय सुविधांची अवस्था शोचनीय आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. येथे एकूण ९ डॉक्टर कार्यरत आहेत, यातील ३ डॉक्टर घश्यातील स्त्रावाच्या तपासणी‌साठी नमुने घेणेचे काम करतात, व ३ डॉक्टर राखीव असून अन्य ३ डॉक्टर इतर तपासणीची कामे करतात. 


स्वच्छतेचे कोणतेही निकष या ठिकाणी पाळले जात नाहीत. सदर रुग्णालयात गर्भवती रुग्णांसाठी असणारा वार्ड कोरोना कक्षाला लागून आहे व गंभीर बाब म्हणजे यासाठी वेगळे प्रवेशद्वार सुद्धा नाही. तसेच सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसलेने कोणीही रुग्णालयात येवून या वार्डमध्ये सुद्धा जाऊ शकते. या सगळया दुरव्यवस्थेतून अतिशय गंभीर प्रकार ३० एप्रिल २०२० रोजी घडला. एका गर्भवती कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात येऊन नर्स, वार्डबॉय व इतर असे एकूण ६ रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाने बाधित झाले. त्यांचे नमुने पॉझीटीव्ह आल्याने एकाच खळवळ उडाली. यात इतर २ पेशंटांचाही समावेश आहे. हा सगळा प्रकार झालेवर राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांना या सर्व बाबींची कल्पना दिली. 


त्यांनी याची काहीही दाखल न घेता बाधित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देऊ असे सांगितले. ही विधाने बेजबाबदार वाटतात. परिस्थितीचे भान नसल्याचे दर्शवतात. सदर रुग्णालयात डॉ. प्रकाश शिंदे हे कार्यरत आहेत. रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसताना वरिष्ठांची दिशाभूल करून त्यांनी सदर रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून मान्यता मिळवली आहे. एवढे सगळे घडूनही त्यांनी २८ एप्रिल व ५ मे २०२० रोजी रुग्णालयामध्ये लसीकरणाची मोहीम राबवली ही मोहीम अन्यत्र घ्यावी. अश्या पूर्वसूचना त्याना देऊनही त्यांनी मनमानीपणे हे लसीकरण पूर्ण केले. हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून ही बाब गंभीर आहे.


डॉ. प्रकाश शिंदे हे प्रत्यक्ष कामकाजामध्ये कोणताही सहभाग घेत नाहीत. दुय्यम कर्मचाऱ्यांकडून ते रुग्णालयातील कामे करून घेतात. शासनाच्या नियमा प्रमाणे स्टाफने रुग्णालयाच्या आवारात राहून कामकाज पाहणे अपेक्षित असताना ते ५ कि.मी. दूर असलेल्या खाजगी बंगल्यातून रुग्णालयाचे काम करतात. ही बाब बेकायदेशीर असून डॉ. शिंदे यांच्या निदर्शनाला ही बाब आणून ही ते त्याच्याकडे लक्ष देत नाही. कोविडग्रस्त रुग्णांची वेळेवर तपासणी न करणे, त्यांना वेळेवर जेवण न देणे, त्यांना संसर्ग विरहित न ठेवणे इत्यादी गोष्टीवर त्यांचे कोणतेही लक्ष नसल्याने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली असून,याच कारणामुळे त्यांचे मनोधैर्य खचत आहे. चरेगाव येथून रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाग्रस्त कोरोना रुग्णाला कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करावे लागले.दिनांक २ मे रोजी दाखल झालेल्या दोन ग्रस्तांना तसेच सर्वच रुग्णांना वेळेवर सुविधा मिळत‌ नाहीत.


सध्या कराड येथे पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ५ कि.मी. दूर कृष्णा हॉस्पिटल येथे कोरोना ग्रस्तांवर चांगले व यशस्वी उपचार होत असून तेथील कोरोना चाचणी प्रयोग शाळेलाही शासनाची मान्यता मिळाली आहे. तसेच इतर खाजगी हॉस्पिटल सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. तेथे सदरच्या कोविड रुग्णालयाचे स्थलांतर करणे सहज शक्य आहे. कराड नगरपालिकेने अतिशय काळजीपूर्वक व धडाडीने शासनाच्या सूचना अंमलात आणलेने कराड शहरात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. असे असताना डॉ. प्रकाश शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे कराडला गंभीर धोका निर्माण झाला असून कराडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.


कराडचे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे कराड शहराच्या मध्यवस्तीत असून शासनाचे निकष पूर्ण केले नसताना सुद्धा त्याला कोविड रुग्णालय म्हणून मिळालेली मान्यता तातडीने रद्द करून सदर रग्णालयाचे स्थलांतर कराडमधील हॉस्पिटलमधील इतर रुग्णालय ज्याने करून गावाबाहेर, शासनाचे निकष पाळून करावे. तर डॉ. प्रकाश शिंदे यांच्या गैरभाराची‌ तातडीने चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय व कार्यदेशीर कारवाई करावी. अशी मागणी कराडकरांच्यावतीने आपल्याकडे करत आहे. या सगळ्या प्रकारामुळे कराडवासीयांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आणि सर्वात गंभीर म्हणजे हा प्रकार सोबत जोडलेल्या शासनाच्या परिपत्रकातील निकष डावलून दिवसाढवळ्या चालू आहे.


तरी सदर रुग्णालय नॉन कोविड म्हणून घोषित करावे व त्याची कोविड रुग्णालय‌ म्हणून असलेली मान्यता रद्द करावी अन्यथा दिनांक ११ मे पासून कराडकरांना कोरोनाग्रस्त परिस्थिती असूनही ररत्यावर उतरून जनअंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.