सरपंचांना शिवीगाळ, कारवाईची मागणी


सरपंचांना शिवीगाळ, कारवाईची मागणी


पाटण : चैगुलेवाडी-मुट्टलवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थांची ऐन उन्हाळयात लाॅकडाऊनच्या काळात पाण्यासाठी भटकंती सुरु होती. त्यामुळे शासनाकडील टॅंकर ने पाणी पुरवठा सुरु झाला होता. टॅंकर मधील 80 टक्के पाणी गावच्या विहीरीत तर 20 टक्के पाणी कात्रे-जाधव वस्तीला देण्याचा ठराव झाला होता. मात्र गावातील काही ग्रामस्थांनी कात्रे-जाधव वस्तीला पाणी द्यायचं नाही असा विरोध करत सरपंचांना शिवीगाळ, धक्काबुक्की करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप चैगुलेवाडी-मुठ्ठलवाडी सरपंच सौ.जयश्री रविंद्र मुटल यांनी निवेदनाव्दारे केला आहे.


निवेदनात सरपंच सौ.जयश्री रविंद्र मुटल यांनी म्हटले आहे, ‘‘चैगुलेवाडी येथे ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय होवू नये यासाठी शासनाने टॅंकर ने पाणी पुरवठा करावा. तशी मागणी ग्रामपंचायतीने शासनाकडे केली होती. गावातील विहीरीत 80 टक्के पाणी व 20 टक्के पाणी नजीक असलेल्या जाधव-कात्रे वस्त्यांना देण्याचा ठराव घेण्यात आला होता. गुरुवार दि.’’14 मे, 2020 रोजी सकाळी आठ वाजता शासनाकडून पाठवण्यात आलेला पाण्याचा टॅंकर गावातील विहीरीत खाली करत असताना गावातील काही नागरिकांनी गर्दी करत जाधव-कात्रे वस्तीला पाणी देण्यास विरोध केला व माझ्या घरासमोर गर्दी करत शिवीगाळ करुन मला जीवे मारण्याची धमकी दिली असून याची चैकशी करुन संबंधितांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सरपंच सौ.जयश्री रविंद्र मुटल यांनी केली आहे.