शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार...लॉकडाऊनबाबत जिल्ह्यात  सुधारीत आदेश जारी...सर्वांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन

 


शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार...लॉकडाऊनबाबत जिल्ह्यात  सुधारीत आदेश जारी...सर्वांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन


सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 20 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोडचे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू केले आहेत.  दिनांक 2 व 3 मे रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे जिल्ह्यात 6 मे रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत पुढील प्रमाणे अटी व शर्तीवर सूट देण्याचे आदेश पारित केले आहेत. या आदेशास जिल्हावासियांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.


शासनाच्या 2 व 3 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार सातारा जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनामध्ये 6 मे  पासून  अटी व शर्तीवर सूट देण्यात आली आहे.  तथापि प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) जाहिर करण्याचे अधिकार यापूर्वीच सातारा जिल्ह्यातील संबधित संबंधित उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर यांना देण्यात आले आहेत. यापूर्वी इन्सीडंट कमांडर यांनी विस्तृतपणे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले आहे.  इन्सीडंट कमांडर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार नवीन प्रतिबंधित क्षेत्राचे आदेश निर्गमित करावेत. 
प्रतिबंधित क्षेत्राबाबत क्रिमीनल प्रोसिजर कोडचे कलम 144 प्रमाणे यापूर्वी निर्गमित केलेले आदेश हे रद्द करेपर्यंत चालू राहतील. नवीन आदेश निर्गमित होईपर्यंत जुन्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. दि. 2 व 3 मे रोजीच्या शासन निर्णय अधिसुचनेनुसार  अशा प्रतिबंधित क्षेत्रात सूट लागू असणार नाही तसेच जर एखादया परिसरात नव्याने कोविड-19 चे बाधित रुग्ण आढळून 1 आला तर त्या भागात देणेत आलेली सूट तात्काळ बंद करण्यात यावी.


*1)सातारा जिल्हा रेड झोन मध्ये असल्यामुळे व लॉकडाऊन कालावधीत वाढ करणेत येऊन पुढील बाबी पुढील आदेश  होईपर्यंत संपूर्ण जिल्हयात प्रतिबंधित राहील.*
• सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई सेवा (वैदयकिय सेवा Air Ambulance, सुरक्षा विषयक आणि केंद्रीय गृहमंत्रालयादवारे परवानगी दिलेली सेवा वगळून)
• सुरक्षा दलाचे वाहतूक आणि केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे परवानगी दिलेली सेवा वगळून इतर सर्व प्रवासी रेल्वे सेवा वाहतूक.
• सार्वजनिक बस वाहतूक. (केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेली सेवा वगळून) 
• मेट्रो रेल्वेसेवा
• नागरिकांचे वैद्यकीय कारणास्तव किंवा मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या उपाययोजना वगळून आंतरजिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक बंद राहील.
• सर्व शाळा, कॉलेज शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था इ.बंदी राहील. तथापि दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण यास सूट असेल. 
• या मागदर्शक तत्वानुसार विशेषत: परवानगी असलेल्या सेवा वगळून इतर हॉस्पिटॅलिटी सेवा.
• सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्लेक्स, व्यायामशाळा, खेळ संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृह, बार, आणि सभागृह असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणे.
• सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम आणि इतर मेळावे.  
• सर्व धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बंद राहतील तसेच धार्मिक स्थळांवर गर्दी करणेस मनाई असेल. 
• सायकल रिक्षा/ऑटो रिक्षा 
• टॅक्सी/कॅब सेवा,
• बससेवा.
• सलून/स्पा दुकाने.
•  पानटपरी 


*2)सातारा जिल्हा रेडझोन असल्याने, कंन्टेनमेंट झोन सोडून, खालील कृतींना परवानगी दिली जाईल.*
• शासनाच्या अधिसूचनेनुसार http://permission.midcindia.org या वेबसाईटवर सर्व कंपन्यांनी त्यांची योग्य व कायदेशीर माहिती भरुन आवश्यक ती कार्यवाही करावी. 
•  ग्रामीण भागातील सर्व उदयोग/व्यवसाय.
• केवळ परवानगी असलेल्या कामांसाठी व्यक्ती आणि वाहनांची हालचालीसाठी मुभा असेल, सदर चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालकाव्यतिरिक्त जास्तीत जास्त 02 प्रवासी असतील व दुचाकी वाहनांवर मागच्या सीटवर व्यक्तीला बसता येणार नाही. 
• शहरी भागातील औदयोगिक आस्थापना/संस्था, नगरपालिका/नगरपंचायत/नगरपरिषद वगळता इतर क्षेत्रातील केवळ विशेष आर्थिक क्षेत्रे (SEZ), निर्यातभिमुख युनिट (ईओयुएस), औदयोगिक वसाहती आणि औदयोगिक वसाहतीमधील औषधे, फार्मासिटिकल्स, वैद्यकिय उपकरणे, त्यांचा कच्चा माल आणि मध्यस्थी यासह आवश्यक वस्तुंच्या उत्पादनांचे युनिटस, उत्पादन युनिट, सातत्याने प्रकिया आवश्यक असणारे युनिट व त्यांची पुरवठा साखळी, माहिती तंत्रज्ञान  लागणारे (आयटी) हार्डवेअरचे उत्पादन आणि पॅकेजिंग मटेरियलच्या मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स सुरु करणेस परवानगी आहे मात्र त्यासाठी सामाजिक अंतर व योग्य शिफ्टची काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक उपक्रमांना परवानगी राहील.
• औदयोगिक आस्थापनांना ग्रामीण ते शहरी व शहरी ते ग्रामीण वाहतूक बंद करण्यात आलेला आदेश रदद करण्यात येत आहे. तसेच औदयोगिक आस्थापनांनी त्यांच्या कामगार किंवा अधिकारी यांचेसाठी सायं. 7 नंतरच्या प्रवासासाठी कंपनीच्या बसनेच प्रवास करावा व त्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर यांचेकडून पास उपलब्ध करुन घ्यावा. सायं. 7  ते सकाळी 7  कोणतीही वाहतूक वैयक्तिक वाहनाने करता येणार नाही. तसेच परजिल्हयातून कर्मचारी किंवा अधिकारी यांना प्रवास किंवा कामासाठी परवानगी अनुज्ञेय नाही.
•  शहरी भागातील बांधकामे केवळ परिस्थितीजन्य बांधकामे (जेथे प्रत्यक्ष जागेवर कामगार उपलब्ध असतील आणि बाहेरुन कामगार आणण्याची आवश्यकता नाही.) आणि renewable energy प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी आहे. ग्रामीण भागात सर्व बांधकामांना परवानगी आहे.
•  शहरी भागातील म्हणजे नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व मॉल्स, काँप्लेक्स, बाजार संकुल, मार्केट बंद राहतील. (नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील भाग) तथापि बाजारपेठ आणि बाजार संकुलामध्ये अत्यावश्यक वस्तूची विक्री करणारी दुकाने यांना परवानगी राहील. तथापि अनुक्रमांक 14 मधील परिशिष्ठ 1 नुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. सर्व एकल दुकाने किंवा निवासी संकुलातील सर्व दुकाने (आवश्यक व अत्यावश्यक सेवेचे) ही कन्टेनमेंट झोन क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात चालू राहतील. ग्रामीण भागातील मॉल वगळता सर्व दुकाने अत्यावश्यक व इतर (आवश्यक व अनावश्यक) असा भेद न करता सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. सर्व ठिकाणी सामाजिक अंतर (दो गज की दुरी) राखली जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच ही सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 6 या वेळेतच सुरु राहतील.
• कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील खाजगी कार्यालये 33 टक्के मनुष्यबळाचा वापर करुन सुरु करु शकतील इतर कर्मचारी हे आवश्यकतेनुसार घरुन काम करु शकतील. तथापि अनुक्रमांक 14 मधील परिशिष्ट 1 नुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. 
• कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये ही अधिका-यांच्या 100 टक्के उपस्थितीत व कर्मचा-यांच्या 33 टक्के उपस्थितीत सुरु राहतील. तथापि संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पोलीस, कारागृह, गृहरक्षक, नागरी संरक्षण, अग्नीशमन आणि आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधीत सेवा एनआयसी, सीमा शुल्क एफसीआय, एनसीसी, एनवायके, आणि नगरपालिका सेवा कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरु राहतील. उपनिबंधक(सब रजिस्टार कार्यालय) कार्यालये सुरु करणेबाबत वेगळे आदेश निर्गमित करणेत येतील.
• मान्सूनपुर्व सर्व काम, ज्यामध्ये इमारतीचे संरक्षण, शटरिंग, वॉटरप्रुफिंग, पुर संरक्षण, इमारती पाडणे इत्यादी कामांना समावेश आहे.


*3)सातारा जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणाशिवाय रात्री 7 ते सकाळी 7 या कालावधीत प्रतिबंधित करण्यात येत आहेत.*


*4)जिल्हयातील वाईन, बिअर शॉप्स, देशी दारु दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.*


*5)सातारा जिल्हयातील कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व ठिकाणी शेती विषयक सर्व कामे सुरु राहतील परंतू सोशल डिस्टंसिंग व इतर सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.*
 
त्या क्षेत्रात लागू असलेल्या कंटेनमेंट झोनचा तपशील आणि भौगोलिक नकाशे हे संबंधीत उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर यांचे कार्यालयास उपलब्ध असतील.


*सवलत देण्यात आलेल्या बाबींच्या पासेसबाबत*
महाराष्ट्र शासन यांचे आदेशातील सवलत देण्यात आलेल्या बाबीकरीता पासेस देण्याचे कामकाज उपविभागीय दंडाधिकारी हे घटना व्यवस्थापक (इन्सीडंट कमांडर) म्हणून आपले कार्यक्षेत्रात करतील. तसेच सदर आदेशाबाबत काही संधिग्धता दूर करणे किंवा काही खुलासा गरजेचा असल्यास त्याविभागातील इन्सीडंट कमांडर म्हणून उपविभागीय अधिकारी याबाबत निर्णय घेतील.


शासनाच्या लॉकडाऊनच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी ही संबंधीत संस्था / आस्थापना आणि शासनाचे संबंधीत विभाग यांची राहील. संबंधित उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी हे घटना व्यवस्थापक (इन्सीडंट कमांडर) म्हणून या निर्देशाप्रमाणे पालन होते किंवा नाही हे सुनिश्चित करणेस जबाबदार असतील. तसेच ज्या परिसरामध्ये नव्याने कोरोनाचे बाधित रुग्ण आढळून येतील तेव्हा संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी कंटेनमेंट झोन जाहीर करुन त्या भागात सुट बंद करणेबाबत तात्काळ कार्यवाही करतील. 
 
थुंकल्यास 1000 रुपये दंड


सातारा जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय जागा व सर्व खाजगी जागा (जेथे सामान्य माणसांचा वावर आहे) अशा कोणत्याही ठिकाणी थुंकणेस मनाई करणेत येत आहे आणि कोणीही व्यक्ती थुंकल्यास, त्यास 1000/- रु दंड आकारण्यात येईल व हा दंड ती जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल त्यांचेकडे जमा करावा किंवा हा दंड त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सक्तीने वसूल करावा.


चेह-यावर मास्क परिधान न केल्यास 500 रुपये दंड


सातारा जिल्हयात घराबाहेर पडताना व घरी परत येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. तसेच तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारण्यात येईल व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जमा करावा किंवा हा दंड त्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सक्तीने वसूल करावा.


आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई


या आदेशास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांच्या विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860 ) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी असे आदेशात नमुद आहे.


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
सातारा जिल्ह्यात 21 रुग्णांची नोंद.... एकूण रुग्णांची संख्या 113
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image
कराड वार्तापत्र - गोरख तावरे जनशक्ती आघाडीमध्ये बंड झाल्याने गटात गट निर्माण जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या विविध समितींच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने कराड नगरपालिका राजकारणात हालचालीस प्रारंभ झाला आहे. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या गटाला स्वतंत्र बसण्यासाठी वेगळी जागा सभागृहात द्यावी, अशी मागणी केल्याने जनशक्ती आघाडीत फूट पडली. कराड नगरपालिकेच्या राजकारणातील गटात गट निर्माण झाल्याची चर्चा संपूर्ण शहरभर सुरू आहे. दरम्यान ऐतिहासिक कराड नगरपालिका राजकारणातील आघाड्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. यापूर्वीही अनेक वेळेला नगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या विचाराच्या निवडून आलेल्या आघाड्यांमध्ये बंड झाले, फूट पडली अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना 25 विरुद्ध 24 अशी सदस्य संख्या होती. दरम्यान एका सदस्याने बंड पुकारून विरोधात गेल्यामुळे सत्ताधारी गट अल्पमतात आला होता. दरम्यान मुरब्बी राजकारणी असणारे पी. डी. पाटील यांनी एका दिवसात हे बंड मोडून काढले. आपला गेलेला सदस्य पुन्हा आपल्या गटात घेऊन आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या राजकारणामुळे कराड नगरपालिकेतील सत्ताधारी जनशक्ती आघाडीमध्ये फुट पडली असे बोलले जात आहे. नगरपालिका म्हटले की, गट-तट, आघाड्या, कुरबुडी, देणे घेणे असे सर्रास घडत असते. जनशक्ती आघाडी फुटली, नगरसेवक घेत असलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे फुटीचे राजकारण हा मुद्दा ऐरणीवर आला.कराड शहरासाठी विकास निधी राज्य शासनाकडून येतो. हा विकास निधी विविध कामावर खर्च करीत असताना कामाचा दर्जा बिलकुल नाही, ठेकेदार दर्जाहीन कामे करतात, हे अनेक कामे पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे. दर्जाहीन विकास कामे होत असल्याने नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. मात्र याकडे नगरसेवक अथवा प्रशासन गांभीर्याने पाहत नाही.यामुळे विद्यमान सत्ताधारी गटातील नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या मनामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मुख्य पदाधिकाऱ्यांसह सर्वच नगरसेवक कराड शहराच्या विकासाकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी गटात गट केलेला कायम राहणार का ? सभापतीच्या निवडीवेळी "तलवार म्यान" होणार का ? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. कारण जयवंत पाटील उपनगराध्यक्ष झाल्यापासून सत्ताधारी गटाचा सर्व कारभार जयवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालला आहे. दरम्यान जयवंत पाटील यांनीच बंड पुकारल्यामुळे जनशक्ती आघाडीचे काय होणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. जनशक्ती आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आणि उपनगराध्यक्ष जयंवत पाटील यांनी सभागृहात वेगळी बसण्याची मागणी केली. कराड नगरपालिका राजकारणाची दिशाच बदलली आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांच्यामध्ये समेट घडावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. विविध समितीच्या सभापतीची निवड करण्याचा अधिकार कोणाला ? आघाडीच्या अध्यक्षांना का नगरपालिकेतील गटनेत्याला ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान विविध समितीच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने आत्तापर्यंत राजेंद्र माने,महेश कांबळे, किरण पाटील यांना सभापती पदाची संधी मिळालेली नाही. यावेळेला सभापतीपदाची लॉटरी या तीन उमेद नगरसेवकांना लागेल का नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कराडच्या नगरसेवकांची भूमिका संभ्रमावस्थेत राहिली होती. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा कुणाला द्यायचा ? प्रचार कोणाचा करायचा ? याबाबत मात्र कराड नगरपालिकेतील नगरसेवकांचे लवकर एकमत झाले नाही. कराडच्या नगरसेवकांनी आपली भूमिका लवकर स्पष्ट केली नाही. विधानसभा निवडणुकीतील नगरसेवकांच्या भूमिकेबाबत कराडमध्ये आजही चर्चा सुरू आहे.कराड नगरपालिकेला निवडून येणार्‍या नगरसेवकांची भूमिका कराड शहराच्या विकासाबाबत संवेदनशील हवी, मात्र सध्या ती दिसून येत नाही.  नगरपालिका निवडणुकीनंतर कराड नगरपालिकेमध्ये राजकीय तीन गट अस्तित्वात आले. यामध्ये लोकशाही आघाडी विरोधात बसली आहे. भाजपाचे काही नगरसेवक निवडून आले त्यांचा एक गट आहे. त्याचबरोबर सत्ताधारी म्हणून जनशक्ती आघाडी कारभार पाहत आहे. तर भाजपच्या नगराध्यक्षा स्वतंत्रपणे आपला कारभार करीत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्या पाच नगरसेवकांचा वेगळा गट निर्माण केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचा गट म्हणजे गटात गट निर्माण झालेला आहे. जनशक्ती आघाडीच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बरोबर आता इथून पुढे आपला "घरोबा" असणार नाही असे सांगून त्यांनी कराड नगरपालिकेचा कारभार सुरू केला आहे. यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव यांना मांणणारे नगरसेवक आहेत. मात्र राजेंद्रसिंह यादव हे नगरपालिका राजकारणात, नगरपालिका कारभार चालवण्यासाठी जेवढा वेळ द्यायला हवा, तेवढा वेळ देत नाही, त्यामुळे नगरसेवकांनी अडचणी कोणासमोर मांडायच्या ? हा प्रश्नच आहे. अशी एकाकी पडलेले नगरसेवक आता एकत्रित सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. याला किती प्रतिसाद मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये गटातला गट शिल्लक राहतो का ? जनशक्ती आघाडीच्या छत्रछायेखाली निवडून आलेले सर्व नगरसेवक एकत्र राहणार का ? हे काही कालावधीनंतर स्पष्ट होईल.  जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विविध समितींच्या सभापतींची निवडणूक होणार आहे. यावेळी गटातला गट अथवा जनशक्ती आघाडीची काय रणनीती राहणार हे पहावे लागेल. कराडमधील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आपल्यासोबत महेश कांबळे, कश्मिरा इंगवले, माया भोसले, अरुणा पाटील हे नगरेसवक असल्याचा दावा केला आहे. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे भाजपचे डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक आहेत. तर राजेंद्रसिंह यादव गट श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत. त्यामुळेच आता नगरपालिका राजकारणात काय होणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीचे 16 नगरसेवक विजयी झाले. तर या आघाडीला एका महिला नगरसेविकेने पाठिंबा दिला. दरम्यान निवडून आल्यानंतर प्रथम जनशक्ती आघाडीच्या नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वासघात केला आणि त्यांचे नेतृत्व झुगारून दिले. कराड नगरपालिकेत भाजपाचे पाच, लोकशाही आघाडीचे सहा तर बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीसह आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे कॉग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने असे गट कार्यरत आहेत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी राजीनामा द्यावा, असे बहुमतात असलेल्या जनशक्ती आघाडीतील काही नगरसेवकांचे म्हणणे होते. दरम्यान उपनगराध्यक्ष पाच वर्ष माझ्याकडे राहील" या अटीवर "उपनगराध्यक्षपद घेतले असल्याचे जयंतराव पाटील सांगतात. यामुळे उपनगराध्यक्ष बदलाचा प्रश्नच येत नाही. यशवंत आघाडी राजेंद्रसिंह यादव यांची, जनशक्ती आघाडी अरुण जाधव यांची तर लोकसेवा आघाडी जयवंतराव पाटील यांची आघाडी आहे. या तिघे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. जयवंत पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्षपद असल्यामुळे नगरपालिकेत दररोज जयवंत पाटील दिसतात. अरुण जाधव नगरपालिकेकडे फिरकतही नाहीत. तर राजेंद्रसिंह यादव आपल्या कामाचा व्याप सांभाळून, जेवढा वेळ देता येईल तेवढाच वेळ देतात. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ते कोण सोडवणार ? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
Image
वर्धन अग्रोने ऊस बिल त्वरित द्यावीत अन्यथा आंदोलन... सचिन नलवडे यांचा इशारा
Image