कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डची विभागीय आयुक्तांकडून पाहणी


कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डची विभागीय आयुक्तांकडून पाहणी


कराड : महाराष्ट्र शासनाचे पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वार्डची पाहणी केली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांबद्दल त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे विशेष कौतुक केले.


याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील उपस्थित होते.


चेअरमन डॉ. भोसले यांनी आयुक्त श्री. म्हैसेकर यांना कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वार्डाची माहिती दिली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठी 110 बेडचा स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला असून, रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र स्टाफ तैनात करण्यात आला आहे. या स्टाफला सर्व सुरक्षा साधने पुरविण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या स्टाफची राहण्याची व्यवस्था हॉस्पिटल  कॅम्पसमध्येच करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या चाचण्या करण्यास परवानगी मिळाल्याने येथेच चाचणी करून, लवकर निदान करणेही शक्य झाले आहे. 


आत्तापर्यंत 12 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आम्हाला यश आले असून, अन्य कोरोनाबाधित सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आमचे सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ प्रयत्न करत आहेत. यापैकी बऱ्याचशा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. भविष्यात दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढली तरी त्या रुग्णांना सामावून घेऊन, त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यास आमची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती चेअरमन डॉ. भोसले यांनी दिली. 


विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनांचे कौतुक करून, प्रशासकीय स्तरावरील अन्य मार्गदर्शक सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या. यावेळी अन्य डॉक्टर्स व शासकीय अधिकारी उपस्थित होते.


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कोणाला नको आहेत ! मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना हटविण्याचा प्रयत्न सुरू
Image
राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय
Image
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता..सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
Image
राज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील
Image