वृत्तांकन, छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात यावा.


जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार


(आस्थापना शाखा)


ई-मेल आय.डी. - estnandurbar@gmail.com


क्रमांक/य/कक्ष. I/आस्था.3/कावि-2408/2020


दुरध्वनी क्रमांक : 02564-210011 दिनांक-09/06/2020


----------------------------------------------------------


                                   परिपत्रक 


 


युट्युब पोर्टल, फेसबुक न्यूज पोर्टल, ई-न्यूज पोर्टलची केंद्र किंवा राज्य शासनाकडे कुठल्याही. प्रकारची नोंदणी होत नाही. असे पोर्टल किंव वृत्त वाहिनी चालविणाऱ्यांकडून चुकीचे वृत्त प्रसारीत होऊन त्यामुळे शासनाची किंवा प्रशासनाची बदनामी होण्याची शक्यता असते.


अशा परिस्थितीत त्यांची नोंदणी नसल्याने नियंत्रणात्मक कार्यवाही करणेदेखील शक्य होत नाही. जिल्ह्यातील युट्युब पोर्टलच्या प्रतिनिधीच्या चुकीच्या वार्ताकनाबाबत व त्यावर कारवाई करण्यासंदर्भात नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी निवेदनदेखील दिले आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता शासनाकडे नोंदणी होत असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाच वृत्त संकलनासाठी नियमांच्या अधीन राहून सहकार्य करावे. पत्रकार परिषदेलादेखील अधिकृत प्रतिनिधींनाच आमंत्रित करावे. कुठलीही नोंदणी होत नसलेल्या युटयुब, फेसबुक, ई-पोर्टल


चालविणाऱ्या व्यक्तिना पत्रकार किंवा वार्ताहर म्हणून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सुविधा किंवा आमंत्रणे देण्यात येऊ नये किंवा त्यांना माहितीदेखील देऊ नये. त्यांच्याद्वारे चुकीची माहिती प्रसारीत झाल्यास त्वरीत त्याबाबत कायदेशीर कारवाई करावी.अशा अनधिकृत माध्यमांचे प्रतिनिधींनाका वृत्तांकन, छायाचित्रण किंवा चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात यावा.


या सूचनांचे जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख व त्यांच्या अधिनस्थ कार्यालयातील अधिकारीकर्मचाऱ्यांनी कटाक्षाने पालन करावे.


(डॉ. राजेंद्र भारुड)


जिल्हाधिकारी, नंदुरबार


 


 


Popular posts
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
पुणे जिल्ह्यातील "लॉकडाऊन" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा
Image
कोरोना ( कोव्हिड-19 ) संसर्गाची भिती कोणाला ? काय करायचे आणि काय करायचे नाही
Image
  "कृष्णा"मधून आजच्या 6 रुग्णांबरोबर 12 रुग्ण बरे झाले कोरोना संकटावर मात : आशादायक व सकारात्मक चित्र
Image